नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : खलिस्तान चळवळीला खतपाणी घालणाऱ्या कॅनडा सरकारच्या उलट्याबोंबामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणल्या गेले आहेत. ते तुटण्यापर्यंत ताणल्या गेले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या भारत सरकारने घडवून आणल्याचे विश्वसनीय कारणं समोर आल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (PM Justin Trudeau) यांनी केला होता. भारतीय राजदूताची हकालपट्टी केली. त्यानंतर भारताने कॅनडाला त्यापेक्षाही खरमरीत उत्तर दिले. आता भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कॅनडा सरकारने बंदी (Canda Ban RSS) घातल्याच्या बातम्यांनी वातावरण आणखी तापवलं आहे. सध्या या वृत्तानं भारतासह जगभर धुमाकूळ घातला आहे. खरंच कॅनडा सरकारने आरएसएसवर बंदी घातली आहे का? या व्हायरल मॅसेजमागील सत्य तरी काय?
काय आहे सत्यता
कॅनडा सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणल्याची बातमी व्हायरल झाली. पाकिस्तान मीडियातही त्याविषयी चर्चा झाली. गुगलवर अनेकांनी झटपट यासंबंधीची कीवर्ड सर्च करायला सुरुवात केली. पण याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही. कॅनडा सरकारच्या कोणत्याही सरकारी प्रतिनिधीचे याविषयीचे कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही. ट्विटर, फेसबूक वा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॅनाडा सरकारकडून याविषयीचे अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. त्यामुळे व्हायरल मॅसेजमध्ये करण्यात येत असलेला दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.
Just IN:—
The National Council of Canadian Muslims has asked Canadian Prime Minister Justin Trudeau to:➖Immediate Criminal Code Ban on RSS.
➖Dismissal of Indian Ambassador to Canada.
➖Bring back the Canadian ambassador and
➖Put an end to economic ties with India.… pic.twitter.com/Gwsb5UAyMA
— South Asian Perspective (@SAnPerspective) September 20, 2023
कोण आहे NCCM
याविषयीच्या व्हायरल पोस्टमध्ये नॅशनल काऊंसिल ऑफ कॅनेडियन मुस्लीम ( NCCM) या संघटनेचे नाव पुढे आले. या संघटनेच्या मागणीनंतरच कॅनडा सरकारने आरएसएसवर बंदी आणल्याची वार्ता पसरल्याचा दावा करण्यात आला. या संघटनेने काय मागण्या केल्या, याविषयीचा तपशील पाहणे महत्वाचे ठरते.
काय आहे NCCM ची मागणी
युट्यूबवर नॅशनल काऊंसिल ऑफ कॅनेडियन मुस्लीमचे एक युट्यूब चॅनल आहे. ‘NCCMtv’ या युट्यूब चॅनलवर 20 सप्टेंबर रोजी एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लांबलचक आहे. या व्हिडिओतील व्यक्ती या संघटनेची प्रमुख आहे. एनसीसीएमचे सीईओ स्टीफन ब्राउन यांनी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणात कॅनडा सरकारे सत्यता समोर ठेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या पण आहेत मागण्या