वापरलेली ईवी कार ते पॉपकॉर्नवर GST आकारण्याचा निर्णय झाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये अनेक भ्रम पसरले आहेत. सोशल मीडियावर दोन्ही वस्तुंच्या जीएसटी कॅलक्युलेशनवरुन मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आता या बाबतीत सरकारने स्वत:हून पुढाकार घेतला आहे. लोकांच्या मनातील हा भ्रम दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केलेत. पॉपकॉर्नवर जीएसटी आकारण्याच्या निर्णयावरुन सर्वसामान्यांमध्ये कंफ्यूजन निर्माण झालय. कुठल्या कॅटेगरीच्या पॉपकॉर्नवर किती टॅक्स लागणार?. सिनेमाहॉलमध्ये मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर 5 टक्के टॅक्स द्यावा लागणार की, 18 टक्के?. यावरुन कंफ्यूजन निर्माण झालय.
पॉपकॉर्नवरुन संभ्रम कायम असताना यूज्ड ईवी कारचा व्हिडिओ व्हायरल झाला. देशाच्या अर्थमंत्र्यांनी यूज्ड ईवीबद्दल जे स्टेटमेंट केलं, त्यामुळे सुद्धा हा संभ्रम वाढला. यूज्ड कार विकण्याच जे मार्जिन आहे, त्यावर टॅक्स हीच लाइन सगळ्यांनी पकडली. पण आता सरकारने एफएक्यू जारी केलाय. सरकारने पॉपकॉर्न आणि यूज्ड ईवीवरुन जो संभ्रम निर्माण झालाय, तो दूर करण्याचा कसा प्रयत्न केलाय ते समजून घ्या.
पहिला मुद्दा
यूज्ड ईवी कार विकल्यानंतर मिळणाऱ्या प्रॉफिट मार्जिनवर आता 18 टक्के टॅक्स भरावा लागणार यावरुन गोंधळ आहे. जीएसटी काऊसिलच्या या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, चुकीच्या पद्धतीने समजावण्यात आला. त्यामुळे संभ्रम वाढला. म्हणजे, एखाद्याने 10 लाखाची गाडी विकत घेतली. काही वर्षांनी ती 3 लाखात विकली. म्हणजे मधल्या 7 लाखाच्या मार्जिनवर 18 टक्के जीएसटी लागणार. हे पूर्णपणे चुकीच आहे. म्हणजे तुम्ही एखाद सामान मूळ किंमतीपेक्षा कमी भावात विकताय, त्यावर टॅक्स कसा लागेल.
सत्य काय?
सत्य हे आहे की, हा टॅक्स व्यक्तीला नाही, तर डीलरला भरावा लागेल. एखादा व्यक्ती वापरलेली ईवी कार आपल्या ओळखीच्या माणसाला, मित्राला किंवा नातेवाईकाला विकली, तर त्यावर जीएसटी लागणार नाही.
मग, वापरलेल्या कारवर जीएसटी कसा लागेल?
पण त्याचवेळी एखादा माणूस आपली 10 लाखाची कार कुठल्या डीलरला 3 लाखात विकतो, तर विक्रीवर कोणताही टॅक्स लागणार नाही. त्यानंतर डीलरने तीच कार 5 लाख रुपयात विकली, तर डीलरला त्याच्या इंवॉयसमध्ये 2 लाखाच्या प्रॉफिटवर जीएसटी द्यावा लागेल. म्हणजे डीलरच्या प्रॉफिट मार्जिनवर 18 टक्के जीसएटी लागणार.
दुसरा मुद्दा
दुसरीकडे पॉपकॉर्नवरही जीएसटी आकारण्यात येणार आहे. खास बाब म्हणजे पॉपकॉर्नला तीन स्लॅबमध्ये ठेवण्यात आलय. 5 टक्के, 12 टक्के आणि 18 टक्के. पॉपकॉर्नवर जीएसटीची बातमी येताच सिनेमाहॉलमध्ये पॉपकॉर्न महागणार, मॉलमध्ये पॉपकॉर्न महागणार अशी चर्चा सुरु झाली. सरकारच म्हणणं आहे की, मीठ असलेल्या साध्या पॉपकॉर्नवर 5 टक्के कर लागणार. पॅकेट आणि लेबल्ड पॉपकॉर्नवर 12 टक्के आणि कारमेलाइज पॉपकॉर्नवर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल.
पॉपकॉर्नवर GST च गणित समजून घ्या
सरकारी सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सिनेमागृहात खुल्यामध्ये मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर रेस्टॉरंटप्रमाणे पाच टक्के जीएसटी लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार, पॉपकॉर्न चित्रपटाच्या तिकीटसोबत विकला जात असेल, तर त्याला ओवरऑल प्रोडक्ट मानलं जाईल. मुख्य प्रोडक्ट चित्रपटाच तिकीट आहे. सरकारी सूत्रांनुसार पॉपकॉर्न चित्रपटगृहात खुल्यामध्ये विकला जातो. त्यामुळे त्याच्यावर पाच टक्के जीएसटी असेल. पॉपकॉर्न तिकिटसोबत नाही, वेगळा विकला गेल्यास त्यावर जीएसटी बसेल.