तामिळनाडू : तामिळनाडूत अपघात झाला त्यावेळी सीडीएस बिपीन रावत यांच्या पत्नीही हेलिकॉप्टरमध्ये होत्या. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे सीडीएस प्रमुख बिपीन रावत हेही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावतही गंभीर जखमी झाल्या आहेत.
2. कोण आहेत मधुलिका रावत?
मधुलिका रावत या बिपीन रावत यांच्या पत्नी आहेत. मधुलिका रावत आर्मी वेल्फेअर जोडल्या गेल्या आहेत.
3. रावत यांच्यासोबत अनेक कार्यक्रमाला उपस्थित
मधुलिका रावत या आर्मी वेल्फेअरशी जोडलेल्या असल्याने त्या सीडीएस बिपीन रावत यांच्यासोबत काही कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून येतात.
4. आजच्या कार्यक्रमालाही मधुलिका रावत उपस्थित होत्या
सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरण खराब आहे. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.