चेन्नई: तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) कोसळलं. या दुर्घटनेत चारजण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण नऊजण प्रवास करत होते. त्यात माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) हे पत्नीसह प्रवास करत होते. या अपघातात तेही जखमी झाल्याचं वृत्त आहे. मात्र, लष्कराकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.
तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या वेलिंग्टन बेसमध्ये नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सीडीएस बिपीन रावत
मधुलिका रावत
ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर
लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
गुरुसेवक सिंग
जितेंद्र कुमार
विवेक कुमार
बी. साई तेजा
हवालदार सतपाल
दरम्यान, संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. वेलिंग्टनमध्ये आर्म्ड फोर्सचं महाविद्यालय आहे. या ठिकाणी रावत यांचं लेक्चर होतं. तिथून ते कुन्नूरकडे निघाले होते. त्यांना तिथून दिल्लीला जायचं होतं. मात्र, घनदाट जंगलात ही दुर्घटना घडली.
कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं.
हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होतं.
हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर आगाची भडका उडाला. त्यामुळे या दुर्घटनेत काही जण होरपळले आहेत. काही जणांचे मृतदेह मिळाले असून ते 80 टक्के भाजलेले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या:
Tamil Nadu Helicopter Crash : देशातले पहिले सीडीएस बिपीन रावत, वाचा सविस्तर…
Digital Payments : यूपीआय अॅपवरचे व्यवहार होणार महाग? आरबीआयनं काय तयारी केलीय? वाचा…