कोरोनाविषयीची इत्यंभूत माहिती फक्त एका फोनवर, केंद्राकडून हेल्पलाईन नंबर जारी

| Updated on: Mar 15, 2020 | 4:47 PM

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे (Help line number on Corona). या आजारावर ताबा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

कोरोनाविषयीची इत्यंभूत माहिती फक्त एका फोनवर, केंद्राकडून हेल्पलाईन नंबर जारी
Follow us on

नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे (Help line number on Corona). या आजारावर ताबा मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांचे हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्याचे हेल्पलाईन नंबर आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत (Help line number on Corona).

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पाहता केंद्र सरकारने कोविड-19 ला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केलं आहे. तर आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क देशांसोबत व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून कोरोना संकटावर चर्चा करतील.

महाराष्ट्रात 32 कोरोनाबाधित रुग्ण

जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या (Aurangabad Corona Positive Case) कोरोनाची देशासह राज्यातही दहशत पसरली आहे. औरंगाबादमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 32 वर पोहोचली आहे. औरंगाबादेत 59 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. ही महिला रशिया आणि कझाकिस्तानचा दौरा करुन (Aurangabad Corona Positive Case) आली होती. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्य सरकारकडून कठोर निर्णय

कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा धोका वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरु नये यासाठी राज्य सरकारकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तर मुंबईतही कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच, राज्यातील शाळास कॉलेज, जिम, मॉल, चित्रपट गृह हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

‘आयसिस’लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर

Corona | कोल्हापुरात पोल्ट्री व्यावसायिकाकडून साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं, 2 लाख अंडी नष्ट

Corona | कोरोनाची भीती! मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद

Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील