आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचे सरकार आले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपाल अब्दुल नजीर यांनी त्यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलंय. चंद्राबाबू नायडू 12 जून रोजी सकाळी 11.27 वाजता आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत नायडू यांच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला 175 पैकी 164 जागा मिळाल्या आहेत. नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पीएम मोदी आंध्र प्रदेश नंतर ओडिशामध्ये होणाऱ्या शपथविधीला देखील उपस्थित राहणार आहेत. ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार स्थापन होत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. विजयवाडा येथे चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवर नेते हजेरी लावणार आहेत.
आंध्र प्रदेशपासून तेलंगना हे वेगळे राज्य तयार करण्यात आले. त्यानंतर राजधानीवरुन वाद निर्माण झाला होता. आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्यांचा उल्लेख करण्यात आला. मात्र आता तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी एकच राजधानी ठेवण्याची घोषणा केली आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना बहुमत मिळाले आहे. अशा परिस्थितीत ते आता बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी समारंभाच्या एक दिवस अगोदर, तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी जाहीर केले की अमरावती ही राज्याची एकमेव राजधानी असेल.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
– गृहमंत्री अमित शहा
– बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार
– उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
– राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा
– उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
– महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी
– रजनीकांत
– मोहन बाबू
– अल्लू अर्जुन
– ज्युनिअर एनटीआर
– चिरंजीवी
-राम चरण
चंद्राबाबू नायडू 1995 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर त्यांनी आणखी दोन टर्म पूर्ण केले. मुख्यमंत्री म्हणून त्यांची पहिली दोन टर्म संयुक्त आंध्र प्रदेशच्या नेतृत्वाखाली होती, जी 1995 मध्ये सुरू झाली आणि 2004 मध्ये संपली. नंतर राज्याचे विभाजन झाले. त्यानंतर तेलंगणा आणि आंध्रप्रदेश असे दोन राज्य तयार करण्यात आले होते. 2014 मध्ये नायडू विभाजित आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री झाले. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. 2024 पर्यंत ते विरोधी पक्षनेते राहिले.