Chandrayaan-3 | भारत चंद्रावर झेंडा रोवणार, अमेरिकेची भारताच्या Moon Mission वर सर्वाधिक नजर असेल, कारण….

| Updated on: Jul 13, 2023 | 12:46 PM

Chandrayaan-3 | असं काय कारण आहे की, ज्यामुळे अमेरिकेची भारताच्या मून मिशनवर सर्वात जास्त नजर असेल. या मिशन अंतर्गत भारत चंद्रावर काय-काय पाठवणार आहे? चांद्रयान 3 ला चंद्रावर पोहोचायला किती दिवस लागतील? मिशनची इनडिटेल माहिती जाणून घ्या एका क्लिकवर.

Chandrayaan-3 | भारत चंद्रावर झेंडा रोवणार, अमेरिकेची भारताच्या Moon Mission वर सर्वाधिक नजर असेल, कारण....
Chandrayaan-3
Image Credit source: isro
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) इस्रो चांद्रयान-3 लॉन्च करणार आहे. 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस स्टेशनवरुन मिशन लॉन्च होईल. चंद्राच्या पुष्ठभागावर सुरक्षित लँडिंग हे इस्रोच पहिलं लक्ष्य आहे. भारताने 2019 साली चांद्रयान-2 मिशन लॉन्च केलं होतं. पण हे मिशन यशस्वी ठरलं नव्हतं. आता चांद्रयान-3 मिशनमध्ये डिजाइनपासून असेंबलीपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.

चांद्रयान-3 मिशनवर संपूर्ण देशाच लक्ष आहे. जगातील अनेक देशांची या मोहिमेवर नजर असेल. अमेरिकेने सुद्धा म्हटलय की, भारताच मून मिशन आमच्यासाठी महत्वाच आहे.

अमेरिकेसाठी हे मिशन इतक महत्वाच का?

चांद्रयान-3 मिशनचा डाटा आर्टिमस मिशनसाठी महत्वाचा ठरणार आहे. आर्टिमस मिशनच्या माध्यमातून अमेरिकेला पुन्हा एकदा मानवी चंद्र मोहिम करायची आहे. भारत-अमेरिकेने आर्टिमस करारावर स्वाक्षरी सुद्धा केली आहे.

कधी झाली मिशनची सुरुवात?

मिशनची सुरुवात जानेवारी 2020 मध्ये झाली होती. वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सनी स्पेसक्राफ्टची डिजाइन आणि असेंबलीवर बरीच मेहनत केलीय. मागच्या मिशनमध्ये झालेल्या चूकांमधून धडा घेतलाय. यावेळी लँडरचे पाय मजबूत बनवण्यात आले आहेत.

मिशनसाठी कुठलं रॉकेट?

चांद्रयान-3 मिशनला ‘लॉन्च व्हीकल मार्क 3’ (LVM 3) रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च केलं जाईल. यावेळच्या मिशनमध्ये ऑर्बिटरचा समावेश नाहीय. स्पेसक्राफ्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे.

चांद्रयान-3 ला चंद्रावर पोहोचायला किती दिवस लागणार ?

14 जुलैला मिशन लॉन्च होईल. ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात यान चंद्रावर पोहोचेल. स्पेसक्राफ्ट चंद्रापर्यंत पोहोचायला 45 ते 48 दिवस लागतील. 23 किंवा 24 ऑगस्टला स्पेस क्राफ्ट चंदावर लँड करेल.

मिशननुसार, चंद्रावर काय-काय पोहोचणार?

चांद्रयान-3 मिशनमध्ये प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर आहे. यात लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पुष्ठभागावर उतरतील. प्रोपल्शन मॉड्यूल वेगळा होईल. प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं झाल्यानंतर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. रोव्हर चांद्रभूमीवर आपलं संशोधन कार्य करणार आहे.

मून मिशनचा उद्देश काय?

इस्रोला मून मिशनतंर्गत तीन गोष्टी साध्य करायच्या आहेत. सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर आणि रोव्हरच सुरक्षित लँडिंग करायच आहे. त्यानंतर चंद्रावर रोव्हरला ऑपरेट करायच आहे. तिसरा वैज्ञानिक शोध घेणं हा उद्देश आहे.