बंगळुरु : भारताच्या चांद्रयान-3 मिशनच जगभरातून कौतुक होतय. बुधवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने चांद्रभूमीवर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनीच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलय. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीच पाकिस्तानात कौतुक करण्यात आलं. पण पाकिस्तानची अधिकृत भूमिका अजूनपर्यंत समोर आली नव्हती.
भारताने अत्यंत कमी खर्चात ही चांद्रमोहिम यशस्वी करुन दाखवली. भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेपक्षा अनेक हॉलिवूड, बॉलिवूड चित्रपटांच बजेट जास्त आहे. शुक्रवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची साप्तहिक पत्रकार परिषद झाली.
काय म्हटलय पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने?
त्यामध्ये प्रवक्त्या मुमताज जहरा यांना विचारण्यात आलं की, सध्या जी आंतरराष्ट्रीय घडामोड घडली. भारताने चंद्रावर लँडिंग केलं. पाकिस्तान याकडे कसा पाहतो?. या प्रश्नावर मुमताज जहरा म्हणाल्या की, “मी एवढच म्हणीन की, हे मोठं वैज्ञानिक यश आहे. यासाठी इस्रोचे वैज्ञानिक कौतुकास पात्र आहेत” वर्तमान परिस्थितीत दोन्ही देशांचे जे संबंध आहेत, त्यामध्ये पाकिस्तानने भारतच कौतुक केलय. हे फारच कमीवेळा पहायला मिळतं.
🔴LIVE: Spokesperson’s Weekly Press Briefing 25-08-23 at Ministry of Foreign Affairs, Islamabad https://t.co/Cm0XGrWeZx
— Spokesperson 🇵🇰 MoFA (@ForeignOfficePk) August 25, 2023
त्यावेळी भारताची खिल्ली उडवणारा पाकिस्तानी मंत्री आता म्हणतो….
पाकिस्तानचे माजी विज्ञान मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी इस्रोला शुभेच्छा देताना म्हटलं की, ‘इस्रोसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे’. याच फवाद चौधरीने चांद्रयान-2 मिशन फसल्यानंतर भारताची खिल्ली उडवली होती.
पाकिस्तानला ब्रिक्सच सदस्यत्व मिळणार का?
दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स परिषद झाली. त्यात 6 नव्या देशांना एन्ट्री मिळाली आहे. 1 जानेवारी 2024 पासून इराण, अर्जेंटीना, इथियोपिया, इजिप्त, यूएई आणि सौदी अरेबिया ब्रिक्सचे नवीन सदस्य असतील. “पाकिस्तानने अजूनपर्यंत ब्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी कुठलीही विनंती केलेली नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करु, त्यानुसार ब्रिक्समध्ये सहभागी होण्याबद्दल ठरवू” असं मुमताज जहरा म्हणाल्या.