बंगळुरु : चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला चंद्राच्या पुष्ठभागावर 10 दिवस पूर्ण झाले आहेत. एकप्रकारे विक्रम आणि प्रज्ञानचा चंद्रावरील हा शेवटचा आठवडा आहे. 14 दिवसानंतर चांद्रयान-3 च मिशन समाप्त होणार का? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 14 दिवसानंतर चंद्रावर काम करणं बंद करतील. कारण त्यांची रचनाच 14 दिवसांसाठी करण्यात आली आहे. विक्रम आणि प्रज्ञानने मधील उपकरण सौरऊर्जेवर चालतात. 14 दिवसांनी चंद्रावर रात्र होईल, त्यावेळी लँडर आणि रोव्हरला सौर ऊर्जा मिळणार नाही. कारण चंद्रावर रात्रीच्यावेळी इतकं थंड वातावरण असत की, ही उपकरण गोठून जातील. चांद्रयान-3 मिशनमध्ये आणखी एक उपकरयण चंद्रावर गेलय.
या उपकरणाच नाव LRA आहे. ते आपल काम आता सुरु करणार आहे. हे एलारएस काय आहे?. तो चांद्रयान-3 मिशन कसं पुढे घेऊन जाणार ते समजून घेऊया. विक्रम लँडरसोबत चौथा पेलोड चंद्रावर पाठवण्यात आला आहे. नासाने या उपकरणाची निर्मिती केली आहे. लेज़र रेट्रोरिफ्लेक्टर ऐरे (LRA) असं या उपकरणाच नाव आहे. विक्रम आणि प्रज्ञान काम करणं बंद करतील, त्यावेळी खऱ्या अर्थाने LRA च काम सुरु होईल. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. विक्रम लँडर एकूण चार पेलोड सोबत घेऊन गेला होता. यात रंभा, चेस्टे आणि इस्ला आहे. ही उपकरण इस्रोने बनवली होती. लँडिंगनंतर त्यांनी काम सुरु केलं. पण LRA नासाच्या स्पेस फ्लाइट सेंटरने बनवलेल उपकरण आहे.
LRA च मुख्य काम काय असेल?
लँडरच लोकेशन ट्रॅक करणं हे LRA च मुख्य काम आहे. LRA ऑर्बिटरच्या संपर्कात असेल. ही एक प्रकारची लेजर लाइट आहे. ऑर्बिटरच्या संपर्कात आल्यानंतर हे उपकरण काम करतं. आपलं लोकेशन या उपकरणाकडून सांगितलं जातं. विक्रम आणि प्रज्ञान कार्यरत असेपर्यंत LRA काम करणार नाही. त्यानंतर LRA काम सुरु करेल. नासाच्या या उपकरणाची रचनाच तशी केली आहे. लँडर आणि रोव्हरच्या कामात अडथळा आणू नये, अशा पद्धतीने एलआरए बनवलं आहे. LRA दीर्घकाळ काम करेल. भविष्यातील मोहीमांसाठी उपयुक्त ठरेल. LRA विक्रम लँडरच्या वर आहे. इस्रोने ही माहिती दिली आहे.