नवी दिल्ली : भारताच मिशन चांद्रयान-3 महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर उतरुन आठवड्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. चंद्रावरुन दररोज एक नवीन अपडेट समोर येत आहे. लँडर आणि रोव्हर दोघांकडून चंद्रावर मोठ्या प्रमाणात संशोधन कार्य सुरु आहे. लँडर आणि रोव्हरने आतापर्यंत केलेल्या संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आलीय. दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या पुष्ठभागावर आणि जमिनीतच्या आत असलेल्या तापमानात बराच फरक दिसून आलाय. त्याशिवाय चंद्रावर सल्फर, ऑक्सिजन या महत्त्वाच्या घटकांचा शोध लागला आहे. चंद्रावरील स्थिती संदर्भात अजून महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. चांद्रयान-3 हे भारतच मिशन यशस्वी ठरलं आहे.
काल प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पुष्ठभागावर असलेल्या विक्रम लँडरचा फोटो काढला होता. आता विक्रम लँडरने प्रज्ञानला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. प्रज्ञान रोव्हरची चंद्रावर भ्रमंती सुरु आहे. या दरम्यान विक्रम लँडरने व्हिडिओ शूट केला. गुरुवारी इस्रोने हा व्हिडिओ टि्वट केला. प्रज्ञान रोव्हर चंद्रावर सेफ रुटच्या शोधात फिरतोय, असं इस्रोने टि्वटमध्ये म्हटलं होतं. प्रज्ञान रोव्हरचे हे फिरणं विक्रम लँडरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. एखाद लहान मुल चंद्राच्या अंगणात खेळतय आणि आई त्याच्याकडे बघतय असा हा व्हिडिओ आहे.
तर तो एक चमत्कार
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा चंद्रावर अजून एक आठवडा बाकी आहे. ही दोन्ही उपकरणं 14 दिवस कार्यरत राहतील अशा पद्धतीने त्यांची डिझाईन करण्यात आली आहे. पृथ्वीवरचे 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. चंद्रावर 14 दिवस सूर्यप्रकाश आणि 14 दिवस रात्र असते. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सौर ऊर्जेवरच चालू शकतात. चंद्रावर रात्र होऊन पुन्हा दिवस होईल, तेव्हा ही उपकरण चालली, तर तो एक चमत्कारच ठरेल.
Chandrayaan-3 Mission:
The rover was rotated in search of a safe route. The rotation was captured by a Lander Imager Camera.It feels as though a child is playfully frolicking in the yards of Chandamama, while the mother watches affectionately.
Isn’t it?🙂 pic.twitter.com/w5FwFZzDMp— ISRO (@isro) August 31, 2023
भारतासाठी अभिमानाचा क्षण
सल्फर, ऑक्सिजनसह एकूण 8 घटक चंद्राच्या मातीत सापडले आहेत. हे मिशनच्या दृष्टीने एक मोठं यश आहे. 14 जुलैला चांद्रयान-3 मिशनची सुरुवात झाली होती. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं. तो भारतासाठी अभिमानाचा क्षण होता. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला तर चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला.
भारताच पहिलं सूर्य मिशन
यशस्वी चांद्रयान-3 मोहीमेनंतर आजपासून भारताच्या सूर्य मोहीमेला सुरुवात होणार आहे. आदित्य एल-1 हा उपग्रह सूर्याच्या कक्षेत प्रस्थापित केला जाईल. सूर्याचा सखोल अभ्यास करणं हा या मोहीमेमागचा उद्देश आहे. आदित्य एल -1 उपग्रह पाचवर्ष कार्यरत राहील. या काळात सूर्याबद्दल बरीच माहिती इस्रोला मिळेल. भारताची ही पहिलीच सौर मोहिम आहे.