chandrayaan-3 launch live : चंद्रयान-3 चे आज दु. 2.35 वाजता उड्डाण, या मोहिमेचे महत्वाचे दहा मुद्दे पाहा

| Updated on: Jul 20, 2023 | 1:54 PM

आतापर्यंत तीनच देश चंद्रावर लॅंडरची सॉफ्ट लॅंडींग करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्यास भारताची अंतराळ संशोधनात मोठी झेप ठरणार आहे. अमेरिका, रशिया, जपान आणि चीननंतर आपली बारी येणार आहे.

chandrayaan-3 launch live : चंद्रयान-3 चे आज दु. 2.35 वाजता उड्डाण, या मोहिमेचे महत्वाचे दहा मुद्दे पाहा
chandrayaan-3-satalite
Image Credit source: ISRO
Follow us on

नवी दिल्ली : भारताचे महत्वाकांक्षी तिसरे चांद्रयान-3 मिशन ( Chandrayaan-3 )आज लॉंच होणार आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोट्टा येथील सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून थोड्याच अवधीत आज दुपारी 2.35 वाजता प्रेक्षपक रॉकेट LVM3-M4 यानाद्वारे चंद्रयान-3 अवकाशात झेपावणार आहे. याच रॉकेटद्वारे चंद्रयान-2 देखील लॉंच करण्यात आले होते. या मोहिमेला फॉलोअप मोहिम म्हटले जात आहे. कारण सप्टेंबर 2019 रोजी चंद्रयान-2 मोहिम थोडक्यासाछी अपयशी ठरली होती.

१ ) चंद्रयान – 3 मिशन म्हणजे काय ?

– चंद्रयान मिशन चंद्रयान-2 या मोहिमेचे फॉलोअप मिशन आहे. यात चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडरची सॉफ्ट लॅंडींग करण्यात येऊन रोव्हर बग्गी चालविण्यात येईल.

२) चंद्रयान-2 पेक्षा चंद्रयान-3 मिशन कसे वेगळे आहे ?

– चंद्रयान-2 मोहिमेत लॅंडर, रोव्हर आणि ऑर्बिटर होता. तर चंद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर ऐवजी स्वदेशी प्रोपल्शन मॉड्यूल असणार आहे. गरज पडल्यास चंद्रयान-2 च्या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ऑर्बिटरची मदत घेतली जाईल, प्रोपल्शन मॉड्यूल चंद्रयान-3 ला लॅंडर- रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर सोडून पुन्हा चंद्राच्या 100 किमी कक्षेत घिरट्या घालत रहाणार आहे. त्याच्याद्वारे कम्युनिकेशन होईल.

३) चंद्रयान-3 मोहिमेचा उद्देश्य काय ?

– इस्रो जगाला दाखविणार की भारतही दुसऱ्या ग्रहावर सॉफ्ट लॅंडींग करु शकतो. आणि रोव्हर बग्गी देखील चंद्राच्या पृष्ठभागावर चालवू शकतो. चंद्राच्या भूभागाचा अभ्यास करणे, हालचाली मातीचा अभ्यास करणे, तेथील वातावरण आणि मातीचा पोत तपासणे असा अनेक पद्धतीने अभ्यास केला जाईल.

४) चंद्रयान-3 बरोबर किती पेलोड्स आहेत ?

या मोहिमेत रॉकेटसोबत एकूण सहा पेलोड्स आहेत. हेव्ही रॉकेट बरोबरचे चंद्रावर नेण्यात येतील. यात लॅंडर ‘रंभा-एलपी , चास्टे chaSTE आणि इल्सा ( ILSA ) लावण्यात आले आहेत. रोव्हरमध्ये एपीएक्सएस ( APXS ) आणि लिब्स ( LIBS) लावले आहेत. प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये एक पेलोड्स शेप ( shape) लावला आहे.

5 ) चंद्रयान-3 किती दिवस काम करणार ?

– चंद्रयान – 3 ऑगस्टमध्ये लॅंड केल्यावर त्याचा लॅंडर आणि रोव्हर चंद्राच्या एक दिवसा इतके काम करणार आहे. चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस असे हा रोव्हर 14 दिवसांच्या मोहिमेसाठी तयार केला आहे. प्रोपल्शन मॉड्यूल तीन ते सहा महिने काम करु शकतो.

6) चंद्रयान कोणत्या रॉकेटद्रारे प्रक्षेपित होईल ?

– चंद्रयान -3 LVM-3 लॉंचर म्हणजे रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. हे रॉकेट खूपच वजनदार असून आतापर्यंत त्याने सहा मोहिमा केल्या आहेत.

चंद्रयान-3 चा प्रवास असा होणार ग्राफिक्समध्ये पाहा  –

७ ) चंद्रयान मोहिमेतील अवघड बाब काय?

– चंद्रयान -3 मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे कठीण बाब आहे. साल 2019 मध्ये सॉफ्ट लॅंडींग करताना वेगावर नियंत्रण न मिळवता आल्याने लॅंडर चंद्रावर जाऊन आदळला होता. आता थ्रस्टर्स इंजिनात बदल केला आहे. त्याचे सेंसर्स अधिक संवेदनशील केले आहेत.

८ ) कितव्या दिवशी चंद्रावर लॅंडींग होणार ?

– 14 जुलै रोजी आकाशात चंद्रयान झेपावल्यानंतर चंद्रयानचा लॅंडर 45 ते 50 दिवसात सॉफ्ट लॅंडींग करेल. दहा टप्प्यात हे मिशन पूर्ण होईल.

९) जगातील किती देश चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग केले आहे.

– आतापर्यंत अमेरिका, सोव्हीएट रशिया आणि चीन या तीनच देशांनी चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग केली आहे. एकूण 38 वेळा चंद्रावर सॉफ्ट लॅंडींगचा प्रयत्न झाला आहे. परंतू यश कमी यश मिळाले आहे.

१०) चंद्रावर सॉफ्ट लॅंडींगचा यशाची टक्केवारी किती ?

– चंद्रावर सॉफ्ट लॅंडींगच्या यशाची टक्केवारी कमी आहे. तीन देशांनी केलेल्या प्रयत्नांचा विचार करता लॅंडींगच्या यशाची टक्केवारी केवळ 52 टक्के आहे. म्हणजे यश मिळण्याची शक्यता 50 टक्के आहे.