बंगळुरु : चांद्रभूमीवर बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताचा तिरंगा फडकला. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच (ISRO) चांद्रयान-3 मिशन यशस्वी ठरलं आहे. भारताने काल इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. अशी कामगिरी करणं बलाढ्य अमेरिका, रशिया आणि चीनला सुद्धा जमलेलं नाही. खरोखरच इस्रोच्या वैज्ञानिकांनी कमाल केलीय. तमाम भारतीयांना त्यांनी अभिमानाचा क्षण अनुभवण्याची संधी दिली आहे. आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रभूमीवर आहेत.
यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काय करतायत? त्यांची स्थिती कशी आहे? या बद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. आता स्वत: इस्रोनेच या बद्दल टि्वट करुन माहिती दिलीय.
ऊर अधिक अभिमानाने भरुन येईल
विक्रम लँडरच्या आतमध्ये प्रज्ञान रोव्हर होता. आता प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर पडला असून त्याने संशोधन कार्य सुरु केलं आहे. या टि्वटमुळे भारतीयांचा ऊर अधिक अभिमानाने भरुन येईल. त्यातून मिशनच यश दिसून येतं.
Chandrayaan-3 Mission:
Chandrayaan-3 ROVER:
Made in India 🇮🇳
Made for the MOON🌖!The Ch-3 Rover ramped down from the Lander and
India took a walk on the moon !More updates soon.#Chandrayaan_3#Ch3
— ISRO (@isro) August 24, 2023
मेड फॉर द मून
गुरुवारी सकाळी इस्रोने चांद्रयान-3 मिशनबद्दल ताज टि्वट केलय. “मेड इन इंडिया, मेड फॉर द मून चांद्रयान-3 चा रोव्हर लँडरमधून बाहेर आलाय. भारताने चंद्रावर मून वॉक सुरु केलाय. लवकरच पुढचे अपडेट्स मिळतील” असं टि्वटमध्ये म्हटलं आहे.
यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर जवळपास दोन तासांनी प्रज्ञान रोव्हर लँडरमधून बाहेर आला. गुरुवारी सकाळी रोव्हरने आपलं काम सुरु केलय. भारताने 14 जुलैला मिशन लॉन्च केलं होतं. जवळपास 40 दिवसांनी भारताच चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं.