नवी दिल्ली : सध्या भारताची तिसरी चांद्र मोहिम सुरु आहे. येत्या 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच लक्ष्य आहे. चांद्रयान 3 सध्या चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत आहे. चांद्रयान 3 मध्ये सेंसर आणि दोन इंजिन आहेत. भले, हे इंजिन फेल झाले, तरी चांद्रयान 3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात सक्षम असेल. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
‘दिशा’ या संस्थेने अवकाश विषयासंदर्भात एका कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. तिथे बोलताना सोमनाथ यांनी ही माहिती दिली. ऐन मोक्याच्या क्षणी काही गोष्टी फसल्यास त्या हातळण्याच्या दृष्टीने विक्रम लँडरच डिझाइन बनवण्यात आलं आहे.
इंजिन फेल झाल्यावरही चांद्रयान 3 कसं करणार लँडिंग
“अचानक काही बिघाड झाला, सगळे सेंसर फेल झाले, काहीच काम करत नसेल, तरीही विक्रम लँडर लँडिंग करेल. अशा पद्धतीने लँडरच डिझाइन बनवण्यात आलं आहे, फक्त प्रोप्लशन सिस्टिमने व्यवस्थित काम केलं पाहिजे” असं सोमनाथ म्हणाले.
आणखी तीन डी-ऑर्बिटिंग कुठल्या तारखेला होणार?
चांद्रयान 3 14 जुलै रोजी अवकाशाच्या दिशेने झेपावलं होतं. यानाने 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यानाला चंद्राच्या जवळ नेण्यासाठी त्यावर आणखी तीन डी-ऑर्बिटिंगच्या प्रोसेस होतील. 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची योजना आहे. डी-ऑर्बिटिंगची प्रोसेस 9 ऑगस्ट, 14 आणि 16 ऑगस्टला होईल.
चांद्रयान 2 अपयशामधून इस्रोने काय शिकलं?
लँडर प्रोप्लशन सिस्टिमपासून वेगळा झाल्यानंतर चंद्रावर सुरक्षित लँडिंगसाठी त्याला वर्टिकल केलं जाईल. हे महत्त्वपूर्ण आहे. चांद्रयान 2 मिशनमध्ये इस्रोला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आलं होतं. लँडरला हॉरिझाँटल ते वर्टिकलमध्ये आणण्याच मॅन्यूव्हर महत्त्वाच असेल. मागच्यावेळी हीच समस्या आली होती. त्यामुळे मिशन फसलं होतं.