Chandrayaan 3 Update | चंद्राच्या जवळ पोहोचला लँडर, इस्रोने शेअर केला नवा VIDEO

| Updated on: Aug 18, 2023 | 4:37 PM

इस्रोने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चंद्राचे जवळून घेतलेले फोटो पाहता येणार आहे.

Chandrayaan 3 Update | चंद्राच्या जवळ पोहोचला लँडर, इस्रोने शेअर केला नवा VIDEO
Follow us on

Chandrayaan 3 | चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर लँडर आता चंद्राच्या दिशेने पुढे जात आहे. शुक्रवारी लँडर चंद्रापासून काहीच अंतरावर आहे. त्याने आता त्याचा वेग कमी केला असून लवकरच तो चंद्रावर लँड होणार आहे. त्याआधी त्याने चंद्राचे काही फोटो आणि व्हिडिओ पृथ्वीवर पाठवले आहे. इस्रोने ट्विटरवर याबाबत अपडेट दिली आहे.

इस्रोने ट्विट केले की लँडर मॉड्यूल (LM) चांगल्या स्थितीत आहे. यशस्वीरित्या डीबूस्टिंग ऑपरेशन केले ज्यामुळे त्याची कक्षा 113 किमी x 157 किमी पर्यंत कमी झाली. दुसरे डिब्लास्टिंग ऑपरेशन 20 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.

गुरुवारी लँडर यशस्वीरित्या वेगळे झाले. या मिशनमध्ये विक्रम लँडरला स्वतः सुमारे 100 किमी अंतर कापायचे आहे. लँडर आता हळूहळू चंद्राच्या दिशेने पुढे सरकत आहे.

इस्रोने शुक्रवारी चांद्रयानवरून घेतलेल्या चंद्राचे दोन व्हिडिओही जारी केले आहेत. ISRO ने ट्विट केले की चांद्रयान-3 च्या लँडर इमेजर (LI) कॅमेरा-1 ने लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केल्यानंतर 17 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राची छायाचित्रे घेतली.

14 जुलै रोजी  प्रक्षेपण केल्यानंतर चांद्रयान-3 ने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती 23 ऑगस्टची. कारण या दिवशी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लँडर चंद्रावर उतरणार आहे.