नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : भारताचं मून मिशन यशस्वी होण्याची शक्यता आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचलं आहे. इसरोने दुसरे आणि अखेरचे डिब्यूस्टिंग ऑपरेशन यशस्वी पार पाडले आहे. या ऑपरेशननंतर चंद्रापासून चांद्रयान-3चं अंतर अत्यंत कमी झालं आहे. लँडर मॉड्यूल आता चंद्रापासून 25 km x 134 km किलोमीटरच्या अंतरावर आहे. या मॉड्यूलला आता इंटरनल चेकिंगमधून जावं लागणार आहे. लँडिंग साईटवर सूर्योदयाची वाट पाहावी लागणार आहे. सर्व काही सुरळीत राहिलं तर 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरेल. तसे झाल्यास भारत जगात इतिहास निर्माण करेल.
इसरोने 1 वाजून 50 मिनिटांनी चांद्रयान-3चे दुसरे डिब्यूस्टिंग ऑपरेशन पूर्ण केले. स्पेस एजन्सीने ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली. लँडर मॉड्यूलने आपलं दुसरं आणि शेवटचं डिब्यूस्टिंग ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. आता त्याची कक्षा कमी होऊन 24 किलोमीटर x 134 किलोमीटर राहिली आहे, असं ट्विट स्पेस एजन्सीने केलं आहे. गती कमी करण्याच्या प्रक्रियेला डिब्स्यूस्टिंग म्हटलं जातं. लंडर मॉड्यूलचं पहिलं डिब्यूस्टिंग ऑपरेशन 18 ऑगस्ट रोजी झालं होतं.
भारताचं मून मिशन चांद्रयान-3 आतापर्यंतच्या प्लानिंग नुसार सुरू आहे. जर सर्व काही व्यवस्थित राहिलं तर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर 5 वाजून 47 मिनिटांनी लँड करेल. लँडिंग यशस्वी झाल्यास भारत इतिहास रचेल. रशिया, अमेरिका आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश बनेल.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर लँडरच्या आतील रोव्हर ( 26 किलोग्रॅम) एक रँपच्या माध्यमातून बाहेर जाईल. त्याच्या आसपासच्या परिसराचा शोध घेईल. इसरोने चांद्रयान-3 ला 14 जुलै रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. 5 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. 16 ऑगस्ट रोजी यानाने आपला शेवटचा मॅन्यूवर पूर्ण केला. 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूलहून लँडर वेगळा झाला.
Chandrayaan-3 Mission:
The Lander Module (LM) health is normal.LM successfully underwent a deboosting operation that reduced its orbit to 113 km x 157 km.
The second deboosting operation is scheduled for August 20, 2023, around 0200 Hrs. IST #Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/0PVxV8Gw5z
— ISRO (@isro) August 18, 2023
चंद्रावर पाऊल ठेवण्याचं भारताचं अधुरं स्वप्न पूर्ण होणार आहे. भारताने 2019मध्ये चांद्रयान-2 मिशन लॉन्च केलं होतं. हे मिशन सॉफ्ट लँडिंग पूर्वीच फेल गेले होतं. त्यामुळे चंद्रावर जाण्याचं भारताचं स्वप्न अर्धवट राहिलं होतं. तेच मिशन आता भारत पूर्ण करत आहे. चांद्रयान 3 चे काम चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणे आहे, चंद्रावर फिरणे आणि संशोधन करणं आहे.