Chandrayaan-3 Update | चंद्राच्या जवळ पोहचले चंद्रयान-3, आता 100 किमी अंतरावरुन परिभ्रमण, एका महत्वाच्या घडामोडीपासून केवळ पाऊल दूर

| Updated on: Aug 14, 2023 | 2:56 PM

चंद्रावर पोहचण्याच्या स्पर्धेत अनेक मोठे देश आहेत. भारता पाठोपाठ रशियाने देखील त्यांचे मिशन लूना-25 लॉंच केले आहे. भारत आणि रशिया दोन्ही देश चंद्राच्या साऊथ पोलवर ( दक्षिण ध्रुव ) लॅंडींग करणार आहेत.

Chandrayaan-3 Update | चंद्राच्या जवळ पोहचले चंद्रयान-3, आता 100 किमी अंतरावरुन परिभ्रमण, एका महत्वाच्या घडामोडीपासून केवळ पाऊल दूर
Chandrayaan 3
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 14 ऑगस्ट 2023 : भारताचं महत्वाकांक्षी चंद्रयान-3 आता चंद्राच्या आणखीन समीप पोहचलं आहे. चंद्राच्या चौथ्या कक्षेत चंद्रयान-3 ने प्रवेश केला आहे. आता किमान 150 किमी बाय कमाल 177  किमी कक्षेत ते फिरणार आहे. चंद्राच्या जवळ जाणाऱ्या चंद्रयान-3 ला आज एक महिना पूर्ण झाला आहे. 14 जुलै रोज चंद्रयान-3 आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चंद्राकडे रॉकेटच्या सहाय्याने झेपावले होते. आता 9 दिवसानंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. त्याआधी चंद्रयानाने अनेक पायऱ्या यशस्वी केल्या आहेत. चला पाहुया त्याचा आजवरचा प्रवास…

चंद्रयान-3 चा प्रवास

चंद्रयानाने 14 जुलै रोजी आंध्रातील श्रीहरिकोटा येथून उड्डाण घेतले होते. त्यानंतर 15 जुलै रोजी पहीली ऑर्बिट ( कक्षा ) वाढविली होती. 17 जुलै रोजी दुसऱ्यांचा कक्षेत वाढ झाली. त्यानंतर 18 आणि 20 जुलै रोजी तिसऱ्या आणि चौथ्या वेळा कक्षेत वाढ करीत वेग वाढविला गेला होता. तर 25 जुलै रोजी पाचव्यांदा कक्षेत वाढ झाली. त्यानंतर पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या रात्री चंद्रयान -3 अखेर पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेकडे ढकलण्यात आले.

चंद्राच्या कक्षेत गेले

अखेर 5 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेशकर्ते झाले. आता चंद्राच्या गुरुत्वाकर्षाचा त्याला अनुभव येऊ लागला होता. त्यानंतर 6 ऑगस्टला प्रथम कक्षेत घटविण्यात आली. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 ने प्रथम चंद्राचा फोटो काढून इस्रोला पाठविला. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 ची दुसऱ्यावेळी ऑर्बिट घटविण्यात आली. आज 14 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता कक्षा कमी करण्याचे पुढील मॅन्युव्हर ऑपेरेशन येत्या 16 ऑगस्ट रोजी स. 8.30 वाजता आहे.

इस्रोचे ट्वीट येथे पाहा –

इस्रो रचणार इतिहास

चंद्रावर पोहचण्याच्या स्पर्धेत अनेक मोठे देश आहेत. भारता पाठोपाठ रशियाने देखील त्यांचे मिशन लूना-25 लॉंच केले आहे. भारत आणि रशिया दोन्ही देश चंद्राच्या साऊथ पोलवर ( दक्षिण ध्रुव ) लॅंडींग करणार आहेत. चंद्राच्या साऊथ पोलवर अनेक देशांचा डोळा आहे. संपूर्ण जग या स्पर्धेत आहे.

अनेक देशांचे लक्ष

भारताला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडींग करण्यात यश मिळाले तर अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत चौथा देश ठरणार आहे. अमेरिका आणि रशियाचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. तर चीनने साल 2013 मध्ये पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करण्यात यश मिळविले आहे.