Chandrayan-3 | मिशन चांद्रयान-3 मध्ये एका महिला ऑफिसरवर मोठी जबाबदारी, कोण आहे रितु कारिधाल?

| Updated on: Jul 12, 2023 | 12:50 PM

Chandrayan-3 | आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन तळावरुन चांद्रयान 3 अवकाशाच्या दिशेने झेपावेल. 23 किंवा 24 ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल.

Chandrayan-3 | मिशन चांद्रयान-3 मध्ये एका महिला ऑफिसरवर मोठी जबाबदारी, कोण आहे रितु कारिधाल?
Chandrayan-3 ritu karidhal
Follow us on

लखनऊ : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो येत्या 14 जुलैला महत्वकांक्षी चांद्रयान 3 लाँच करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन तळावरुन चांद्रयान 3 अवकाशाच्या दिशेने झेपावेल. 23 किंवा 24 ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल. या मिशनमध्ये चांद्रयानच्या लँडिंगची जबाबदारी रितु कारिधाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

रितु कारिधाल या उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊशी संबंधित आहेत. त्या रॉकेट वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जातात. अवकाश क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांना चांद्रयान-3 चं मिशन डायरेक्टर बनवण्यात आलं आहे. याआधी त्यांनी चांद्रयान-2 सह अनेक महत्वाच्या अवकाश मोहिमांवर त्यांनी काम केलं आहे. युवा वैज्ञानिक पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये रितु कारिधाल यांचा समावेश होतो.

शिक्षण कुठून पूर्ण केलं?

रितु कारिधाल मूळच्या लखनऊच्या आहेत. राजाजीपुरममध्ये त्यांचं निवासस्थान आहे. लखनऊच्या सेंट एगनिस स्कूलमध्ये त्यांचं सुरुवातीच शिक्षण झालं आहे. त्यानंतर त्यांनी नवयुग कन्या विद्यालयातून शिक्षण घेतलं. लखनऊ विश्वविद्यालयात त्यांनी भौतिकीमध्ये एमएससी पदवी मिळवली. त्यानंतर इंडियन इंस्टीट्यूज ऑफ सायन्स बँगलोरमधून त्यांनी एयरोस्पेस इंजीनिअरिंगमध्ये एमटेकची पदवी घेतली.

इस्रोसाठी सोडली PHD

MTech केल्यानंतर रितु कारिधाल यांनी PHD चा अभ्यास सुरु केला. एक कॉलेजमध्ये पार्टटाइम प्रोफेसरची नोकरी स्वीकारली. या दरम्यान 1997 साली त्यांनी इस्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. तिथे त्यांची नियुक्ती झाली. जॉबसाठी त्यांना PHD सोडावी लागणार होती. त्यासाठी त्या तयार नव्हत्या. प्रोफेसर मनीषा गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली त्या PHD करत होत्या. मनीषा यांना समजलं, तेव्हा त्यांनी रितूला इस्रो जॉइन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

मंगळयान मोहिमेत महत्वाची भूमिका

रितु कारिधाल यांचा पहिली पोस्टिंग यू आर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये झाली होती. तिथे त्यांच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं. 2007 मध्ये त्यांना इस्रोचा युवा वैज्ञानिक पुरस्कार मिळाला. त्यावेळी मंगळयान मोहिमेवर काम सुरु होणार होतं. अचानक एकदिवस मंगळयान मिशनचा भाग असल्याच त्यांना सांगण्यात आलं. त्यांच्यासाठी हे धक्कादायक होतं. पण तितकच उत्साहवर्धक सुद्धा.

अशी मिळाली चंद्रयान-3 ची जबाबदारी

रितु कारिधाल चंद्रयान-2 च्या मिशन डायरेक्टर होत्या. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन इस्रोने 2020 मध्येच त्यांना चांद्रयान-3 मिशममध्ये महत्वाची जबाबदारी देण्याच निश्चित केलं होतं. या मिशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर पी वीरामुथुवेल आहेत. चंद्रयान-2 मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर एम वनिता यांना डेप्युटी डायरेक्टरची जबाबदारी मिळाली आहे. पेलोड आणि डाटा मॅनेजमेंटची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

रितू यांच्या कुटुंबात कोण-कोण आहे?

रितु कारिधाल यांना दोन भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. त्यांचा भाऊ लखनऊच्या राजाजीपुरममध्ये राहतो. रितू यांच लग्न अविनाश श्रीवास्तव बरोबर झालय. ते बंगळुरुच्या टायटन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. आदित्य आणि अनीषा अशी दोन मुलं आहेत. रितू आपल्या यशाच श्रेय कुटुंबाला देतात.