चेन्नईतील आयटीसी ग्रँड चोला लग्झरी हॉटेल कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, 85 जण पॉझिटीव्ह

| Updated on: Jan 03, 2021 | 8:32 AM

कर्नाटकात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चेन्नईतील आयटीसी ग्रँड (ITC Grand Chola) चोला लग्झरी हॉटेल हे सध्या कोरोनाचं नवं हॉटस्पॉट (Hot Spot) ठरलं आहे

चेन्नईतील आयटीसी ग्रँड चोला लग्झरी हॉटेल कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, 85 जण पॉझिटीव्ह
Follow us on

चेन्नई : कर्नाटकात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चेन्नईतील आयटीसी ग्रँड (ITC Grand Chola) चोला लग्झरी हॉटेल हे सध्या कोरोनाचं नवं हॉटस्पॉट (Hot Spot) ठरलं आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. या हॉटेलमधील 85 जण 15 डिसेंबरला कोरोना पॉझिटीव्ह आले होते (ITC Grand Chola).

आतापर्यंत 609 जणांचे सॅम्पल कोरोना चाचणीसाठी (Corona Test) घेण्यात आले होते. यापैकी 85 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य सचिव जे राधाकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनने हॉटेलमधील सर्व पाहुण्यांच्या कोरोना अहवालाचे निर्देश दिले होते.

हॉटेलमध्ये कोरोना नियमांची काळजी घेतली जात आहे

आयटीसी ग्रँड चोला लग्झरी हॉटेलकडून जारी करण्यात आलेल्या एका प्रेस रिलीझमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सर्व कार्यक्रमांमध्ये कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन केलं गेलं. हॉलमध्ये सर्व सरकारी नियमांनुसार फक्त 50 टक्के क्षमतेकडेही लक्ष देण्यात आले. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन करण्यात आलं.

नेमकं प्रकरण काय?

चेन्नईच्या हॉटेलमध्ये 15 डिसेंबरला एका शेफला कोरोना झाल्याचं आढळून आलं. 31 डिसेंबरला 16 आणि 1 जानेवारीला कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

609 पैकी 85 जण पॉझिटीव्ह

आरोग्य मंत्र्यानुसार, हॉटेल आणि कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत एकूण 609 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 85 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं आहे. या सर्वांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसली असल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

ITC Grand Chola

संबंधित बातम्या :

कोरोनावरच्या तिसऱ्या लसीला मंजुरी, ‘ही’ लस ठरणार रामबाण?

लढ्याला यश! भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे देशात आणखी चार रुग्ण, आतापर्यंत 29 संक्रमितांची नोंद