हनीमूनसाठी स्वस्त अन् मस्त ट्रेन, 13 देशांचा प्रवास, भाडेही कमी, लग्झरी ट्रेनमध्ये सुविधा काय?

| Updated on: Nov 14, 2024 | 10:48 AM

Luxury Train: सध्या या स्पेशल ट्रेनचे बुकींग स्थगित करण्यात आले आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे ही ट्रेन सध्या बंद आहे. कारण ही ट्रेन मास्कोमध्ये जाते. युद्ध संपल्यानंतर हा ट्रेन प्रवास पुन्हा सुरु होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हनीमूनसाठी स्वस्त अन् मस्त ट्रेन, 13 देशांचा प्रवास, भाडेही कमी, लग्झरी ट्रेनमध्ये सुविधा काय?
Luxury Train (file Photo)
Follow us on

पर्यटन हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. विदेशात पर्यटन करण्याचे अनेकांचा मनसूबे असतात. हनीमून विदेशात करण्याचे अनेक नवदाम्पत्यांचे स्वप्न असते. तुम्हाला एखादी अशी ट्रेन मिळेल जी पोर्तुगाल फिरवले, पॅरीसला घेऊन जाईल. ही ट्रेन जगभरातील 13 देशांमध्ये प्रवास घडवेल. त्याचे भाडेही जास्त असणार नाही. ही ट्रेन तुम्हाला युरोपातील सुंदर देशांमध्ये घेऊन जाईल, तसेच सायबेरियाच्या थंड भागातही घेऊन जाईल. त्यानंतर तुम्ही आशियातील गरम भागातही प्रवास करू शकाल.

एका लाखात असा प्रवास

ट्रेन पोर्तुगाल ते सिंगापूरपर्यंत घेऊन जाईल. हा जगातील सर्वात लांब प्रवास आहे. 21 दिवस या प्रवासासाठी लागतात. 18,755 किलोमीटरचा प्रवास या ट्रेनने पूर्ण होतो. या ट्रेनचे भाडे तुम्हाला खूप जास्त वाटत असेल. परंतु या ट्रेनचे भाडे 1200 अमेर‍िकी डॉलर आहे. भारतीय रुपयांमध्ये जवळपास एक लाख रुपये हे भाडे आहे. म्हणजेच युरोपपासून आशियापर्यंतचा प्रवास फक्त एका लाख रुपयांमध्ये तुम्हाला करता येणार आहे. हा प्रवास लग्झरी ट्रेनमध्ये असणार आहे. त्यात तुमच्या खाण्या पिण्याची सोय असणार आहे. तुम्ही विमानाने असा प्रवास केला तर त्याला लाखो रुपये खर्च होईल. परंतु या ट्रेनने फक्त एक लाख खर्च येईल.

बोटान-व्हिएंटियान रेल्वे मार्गाच्या उद्घाटनामुळे हा ट्रेन प्रवास शक्य झाला. यामुळे ही ट्रेन चीनला दक्षिण पूर्व आशियाशी जोडली जाते. हा प्रवास पोर्तुगीज शहर लागोसपासून सुरू होतो. मग येथून ते स्पेनच्या उत्तरेकडील भागातून पॅरिसला जाते. पॅरिसमधून युरोपमार्गे रशियाची राजधानी मॉस्कोपर्यंत हा प्रवास होईल. त्यानंतर बीजिंगला जाण्यासाठी प्रवासी ट्रान्स-सायबेरियन रेल्वे मार्गावर सहा रात्री प्रवास या ट्रेनचा प्रवास असेल. सर्व प्रवासी बोटान-व्हिएंटियान रेल्वे ट्रॅकद्वारे बँकॉकला पोहोचतील. त्यानंतर तेथून मलेशियामार्गे आणि शेवटी सिंगापूरला पोहोचते.

हे सुद्धा वाचा

सध्या बुकींग स्थगित

सध्या या स्पेशल ट्रेनचे बुकींग स्थगित करण्यात आले आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे ही ट्रेन सध्या बंद आहे. कारण ही ट्रेन मास्कोमध्ये जाते. युद्ध संपल्यानंतर हा ट्रेन प्रवास पुन्हा सुरु होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.