काल लालूंना भेटले, आज शरद यादवांना; भुजबळ ओबीसी आरक्षणासाठी देशव्यापी लढा उभारणार?

| Updated on: Aug 29, 2021 | 5:28 PM

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत. (chhagan bhujbal met lalu prasad yadav and sharad yadav)

काल लालूंना भेटले, आज शरद यादवांना; भुजबळ ओबीसी आरक्षणासाठी देशव्यापी लढा उभारणार?
chhagan bhujbal
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत. यावेळी त्यांनी राजद नेते लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. आज लगेचच ज्येष्ठ नेते शरद यादव यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांसोबत भुजबळांनी ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा देशव्यापी लढा उभारण्याचा भुजबळांच्या हालचाली सुरू तर नाहीत ना? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (chhagan bhujbal met lalu prasad yadav and sharad yadav)

काल पासून मी देशातील अनेक महत्वाचे नेत्यांची भेट घेत आहे. काल लालूप्रसाद यादव यांची भेट मी घेतली त्याचपद्धतीने देशातील अनेक महत्वाच्या पदाधिकारी आज येथे उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी केंद्रसरकारने आरक्षणा संदर्भातले अधिकार राज्यांना दिले मात्र हे अधिकार अगोदर पासून राज्यांनाच होते. मात्र मोदी सरकारनेच ते काढून घेतले होते. अशी आठवण देखील भुजबळ यांनी यावेळी करून दिली. भुजबळ यांनी लालूंची भेट घेतल्यानंतर आज शरद यादव यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये ओबीसी आरक्षणावर अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. ओबीसी आरक्षणावर देशव्यापी लढा उभारण्याची गरज आहे, असं भुजबळांनी यादव यांना सांगितलं असून शरद यादव यांनीही त्यांच्या मताशी सहमती दर्शवल्याचं सूत्रांनी सांगितलं.

देशभरातील आमदार, खासदारांना भेटणार

लालू प्रसाद यादव आणि शरद यादव यांना भेटल्यानंतर भुजबळांनी देशातील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं सांगितलं. देशभरातील सर्व आमदार, खासदार महत्वाचे नेते यांना भेटून ओबीसी आरक्षणाचा विषय आपण समजावून सांगितला पाहिजे. सर्वांनी एकत्रितपणे जर यावर भाष्य केले आणि एक लढा उभारला तरच या प्रश्नातून मार्ग निघेल, असं त्यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा परिणाम हा फक्त महाराष्ट्रच नाही तर देशात सर्वत्र होणार आहे. त्यामुळे सर्वांना हा प्रश्न समजावून सांगने गरजेचे होते, असंही त्यांनी सांगितलं.

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याबद्दलचा निर्णय कोर्टाने दिला आहे. याचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नाही. मात्र राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. या निर्णयाचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे. त्यामुळे देशभरातील सर्व ओबीसींची एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. आगामी काळात देशात जनगणना होणार आहे. ही जनगणना होत असताना ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने देशात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना घटनेने आरक्षण दिले आहे. त्याच पद्धतीने ओबीसींच्या आरक्षणाला घटनेत समाविष्ट करणे गरजेचे आहे यासाठी घटनेत सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (chhagan bhujbal met lalu prasad yadav and sharad yadav)

 

संबंधित बातम्या:

योग्यवेळी सीडी लावणार; ईडीच्या चौकशीवरून एकनाथ खडसेंचा पुन्हा इशारा

अण्णांचा आघाडी सरकारला इशारा, आदिती तटकरे थेट राळेगणसिद्धीला, दोघात काय चर्चा झाली?

जातीनिहाय जनगणना करा, ओबीसींना संवैधानिक आरक्षण द्या; दिल्लीत समता परिषदेच्या बैठकीत ठराव मंजूर

(chhagan bhujbal met lalu prasad yadav and sharad yadav)