नवी दिल्ली : सुरक्षा दल (Security Forces) आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalites) झालेल्या चकमकीत (Encounter) पाच जवान शहीद झाले आहेत. तर 20 जवान जखमी झाले आहे. तर 15 जवान बेपत्ता आहेत. मृतांमध्ये सीआरपीएफचे (CRPF) दोन आणि डीआरजीचे (DRG) तीन जवानांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर (Bijapur) येथे ही चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना तीन नक्षलवादी ठार करण्यात यश आले आहे. सुरेश आणि विक्की असे मृत नक्षलवाद्यांची नावे असून यात एका महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. (Sukma encounter 15 jawans missing Chhattisgarh Police Sources)
पाच जवान शहीद
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बिजापूर (Bijapur) मधील तर्रेम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिलगेर जंगलात ही चकमक घडली. यात तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. यात पाच जवान शहीद झाले आहेत. तर 20 जवान जखमी झाले आहेत. या ऑपरेशननंतर तब्बल 15 जवान बेपत्ता आहेत. सध्या संपूर्ण परिसरात त्यांचा शोध घेतला जात आहे. यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. डीआरजीचे उपनिरीक्षक दीपक भारद्वाज यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
#UPDATE At least 15 jawans missing after yesterday’s Sukma encounter. A reinforcement party rushed to the spot. Bodies of 2 out of 5 jawans who died in encounter recovered. Among injured jawans, 23 admitted to Bijapur Hospital & 7 to Raipur hospital: Chhattisgarh Police Sources
— ANI (@ANI) April 4, 2021
जखमी जवानांवर उपचार
या घटनेनंतर 9 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय बिजापूर येथे दोन MI -17 हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. याद्वारे जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. नक्षलवादी बटालियन कमांडर हिडमा यांच्या पथकाचा यात समावेश असल्याचे बोललं जात आहे. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झीराम हिडमा हा सिल्गर गावचा रहिवासी आहे.
“जखमी सैनिकांना चांगले उपचार द्या”
दरम्यान या घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीतील जखमी सैनिकांना चांगले उपचार द्यावे, अशी सूचना दिली आहे. या सर्व सैनिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, असेही मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. यापूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक डीएम अवस्थी यांनी बिजापूर (Bijapur) मधील सिलगेर जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी झाल्याचे सांगितले होते.
नक्षलविरोधी अभियान
छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानात सीटीएफ, डीआरबी, सीआरपीएफ आणि सीओबीआरएचे सुमारे 400 जवान सहभागी आहेत. हे जवान नक्षल विरोधी अभियानासाठी रवाना झाले होते. जंगलात आल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांना घेरल्यानंतर ही चकमक उडाली. यापूर्वी नक्षलवाद्यांनी मार्चमध्ये आईडी ब्लास्ट केला होता. त्यात पाच जवान शहीद झाले होते. नारायणपूर येथे जवानांच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. डीआरजीचे जवान एक ऑपरेशन यशस्वी करून परत येत असतानाच या बसवर हल्ला करण्यात आला होता. (Sukma encounter 15 jawans missing Chhattisgarh Police Sources)
संबंधित बातम्या :
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 5 जवान शहीद
खाणी आणि खनिजांवरील नवा कायदा संसदेत मंजूर, काय आहेत मोठे बदल?