रायपूर : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल (DRG) दलाच्या वाहनावर IED स्फोटांनी हल्ला करण्यात आला. जवान ऑपरेशनसाठी बाहेर पडले होते. दरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. आता नक्षली आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री सुरु आहेत. शहीद जवानांमध्ये 10 DRG सैनिक आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे. अरणपूरच्या पालनार भागात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला.
असा घडला हल्ला
गुप्तचर विभागाने या भागात नक्षली असल्याचा संदेश दिला होता. त्यानंतर एसओपीचे पालन झाले नाही. त्यामुळे नक्षलींना संधी मिळाली. एसओपीनुसार जवान एक गाडी जाऊ शकत नाही. ऑपरेशन दरम्यान त्यांना पायीच जावे लागते. परंतु कोबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आणि जवान गाडीत गेले. यावेळी २५० जवानांच्या वेगवेगळ्या तुकड्या करण्यात आल्या. त्यातील एका तुकडीवर हा हल्ला करण्यात आला. दरम्यान हा हल्ला झाला तेव्हा एसओपीचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे.
नक्षलींना सोडणार नाही- बघेल
या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही. ही घटना अत्यंत दु:खद आहे. नक्षलवाद्यांविरुद्धची आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे. नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद उखडला जाईल.
#WATCH | IED attack by naxals in Dantewada | "…10 DRG jawans and one civilian driver lost their lives in the attack…Bodies of all of them are being evacuated from the spot. Senior officers are present there. Search operation is underway," says IG Bastar, P Sundarraj. pic.twitter.com/3jebxQkWRH
— ANI (@ANI) April 26, 2023
घटनास्थळी रुग्णावाहिका रवाना
घटनास्थळी दोन रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. या राज्याचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या हल्ल्याबाबत भूपेश बघेल यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की बघेल प्रत्येक हल्ल्यानंतर तेच बोलतात पण ठोस पावले उचलली जात नाहीत.
छत्तीसगड-दंतेवाडा येथे शहीद झालेल्या जवानांची नावे
अमित शहा यांनी केला फोन
नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा हल्लाबाबत चर्चा केली. तसेच राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी सांगितले की, जवान ऑपरेशनसाठी जात होते. दरम्यान, अरणपूरच्या पालनार भागात नक्षलवाद्यांनी आयईडीने जवानांनी वाहन उडवल्याचं, आयजी सुंदरराज यांनी सांगितलं. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याची पद्धत अजिबात बदललेली नाही.