छत्तीसगडमध्ये पोलीस दलाला मोठं यश आलं आहे. नारायणपूरमध्ये चकमकीत सुरक्षा दलाने 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या नक्षलवाद्यांची पोलीस ओळख पटवत आहेत. यावेळी नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवरील माड भागात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून नारायणपूर पोलीस आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी झालेल्या चकमकीत 30 नक्षलवादी ठार झाले आहेत.
नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील थुलथुली गावाच्या जंगलात पोलिसांनी ही कारवाई केली. अशी बस्तर विभागाचे आयजी यांनी दिली आहे. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातून सुरक्षा दलांची तुकडी पाठवण्यात आली होती. त्यात जिल्हा राखीव रक्षक आणि एसटीएफचे जवान देखील होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. यानंतर जवानांनी जबाबदारी घेतली आणि २४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्याकडून एके-47 आणि एसएलआर आणि इतर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत सर्व जवान सुरक्षित आहेतक. परिसरात अधूनमधून गोळीबार सुरू आहे.
Chhattisgarh: An encounter between a joint party of Narayanpur Police and Dantewada Police, and naxals is underway in Maad area on Narayanpur-Dantewada border, following a search operation. Details awaited.
— ANI (@ANI) October 4, 2024
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाईत आतापर्यंत शेकडो नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. ज्या नक्षलवाद्यांना यातून बाहेर यायचं आहे त्यांना विशेष ऑपरेशन अंतर्गत परत येण्याची संधी दिली जात आहे. पण तरी देखील जे नक्षलवाद सोडत नाहीत आणि शांतता प्रस्थापित होऊ देत नाही त्यांचा खात्मा केला जात आहे.
दंतेवाडा आणि नारायणपूरसह सात जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत 189 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. वेगवेगळ्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शुक्रवारी थुलाथुली गावच्या जंगलात ठार झालेल्या नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.