रायपूर : दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात सामील झालेल्या तब्बल 20 लोकांना एका कारने चिरडल्याची धक्कादायक घटना छत्तीसगड येथे घडली आहे. पत्थळगावात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या कारने लोकाना चिरडलं आहे त्यामध्ये गांजा भरलेला होता. चिरडलेल्या वीस लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर बकीच्या जखमी लोकांना पत्थळगावातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या कारने लोकांना चिरडलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा ठेवण्यात आलेला होता. ही दुर्घटना घडल्यानंतर दसऱ्यानिमित्त जमा झालेल्या लोकांनी कारचा पाठलाग केला. तसेच आरोपींना पकडून त्यांना किरकोळ मारहाण केली. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. सध्या या आरोपींना अटक करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ :
Lakhimpur 2.0 in #chattisgarh
Bhupesh baghel, where are you..?? pic.twitter.com/QTIFhxkPHA— HITESH CHAUDHARY (@Modijivi) October 15, 2021
दरम्यान, या घटनेविषयी अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दसऱ्यासारख्या पवित्र सणाच्या दिवशी अशी दुर्घटना घडल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
इतर बातम्या :
एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरकडून महिला सहकाऱ्यावर अत्याचार, घटनेनंतर आरोपी फरार
धक्कादायक ! चवदार सांभार बनवले नाही म्हणून तरुणाकडून आई आणि बहिणीची हत्या
हलगर्जीपणाचा कळस ! टॉयलेटमध्ये बाळांतीण केली, नंतर अर्भकाचं डोकं कमोडमध्ये अडकलं
महंगाई डायन खाए जात हैः डोक्याला शॉट; नाशिकमध्ये डिझेल शंभरच्या पुढे!https://t.co/heSEx4xdw3#Nashik|#Diesel|#Petrol|#Inflation
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2021
(chhattisgarh speedy car crashes 20 people who gathered for dussehra festival)