chhattisgarh Chimney collapses: छत्तीसगढमधील मुंगेली जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. गुरुवारी रामबोड भागात असलेल्या कुसुम प्लँटमध्ये चिमनी पडली. त्यात ३० जण दाबले गेले आहेत. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली. चिमनीखाली दाबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
घटना घडल्यानंतर पोलीस आणि प्रशासनची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या लोकांना काढण्याचे काम सुरु केले आहे. कुसुम प्लॅटमध्ये चिमणी पडल्यामुळे त्या ठिकाणी काम करत असलेले कामगार दाबले गेले. चिमणी पडल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच सरगाव ठाण्यात रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरुन दोन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुसुम प्लँट हा आयरनचा कारखाना आहे. अजून कारखाना पूर्णपणे उभारला गेला नाही. त्याचे काम सुरु आहे. गुरुवारी काम सुरु असताना चिमणी पडली. त्यात ३० जण दाबले गेले. ढिगारा काढण्यासाठी मोठी क्रेन आणि जेसीबी मागण्यात आले आहे. तसेच फायर ब्रिगेडच्या गाड्याही घटनास्थळी पोहचल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय पथक आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.