पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर चीनची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले परराष्ट्र मंत्री?

| Updated on: Apr 11, 2024 | 9:59 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटले होते की, भारतासोबत चीनचे संबंध हे चीनसाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर चीनची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले परराष्ट्र मंत्री?
india vs china
Follow us on

India-china Relation : चीन आणि भारत यांच्यातील संबंध सध्या हवे तितके चांगले नाहीये. चीन आपल्या विस्तारवादी विचारांमुळे शेजारील देशांच्या जागा हडप करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यातच आता चीनने म्हटले की, मजबूत आणि स्थिर संबंध दोन्ही देशांच्या समान हितासाठी काम करतात, असे चीनने गुरुवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेवर चीनने ही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, चीनचे भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत.

काय म्हणाले पीएम मोदी?

‘न्यूजवीक’ या अमेरिकन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले होते की, दोन्ही देशांनी सीमेवर दीर्घकाळापासून सुरू असलेली परिस्थिती तात्काळ सोडवली पाहिजे. राजनैतिक आणि लष्करी पातळीवर द्विपक्षीय चर्चेद्वारे दोन्ही देशांनी सीमेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित केले पाहिजेत.

गुरुवारी पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांना मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्या म्हणाल्या की, चीनने पंतप्रधानांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. आमचा विश्वास आहे की चीन आणि भारत यांच्यातील मजबूत आणि स्थिर संबंध दोन्ही देशांचे समान हित साधतात. प्रादेशिक शांतता आणि विकासासाठी हे महत्त्वाचे आहे.

भारतासोबतच्या संबंधावर काय म्हणाला चीन

माओ निंग म्हणाले की, जोपर्यंत सीमेचा संबंध आहे, तो संपूर्ण भारत-चीन संबंधांचे प्रतिनिधित्व करत नाही. द्विपक्षीय संबंधांमध्ये हे योग्यरित्या ठेवले पाहिजे आणि योग्यरित्या सोडवले पाहिजे. दोन्ही बाजू राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून जवळच्या संपर्कात आहेत.

चीनने केलेल्या सीमा उल्लंघनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया अप्रभावी आणि कमकुवत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पोस्ट केले की, ‘पंतप्रधानांना चीनला कडक संदेश देण्याची संधी होती. त्यांच्या कुचकामी आणि कमकुवत प्रतिसादामुळे चीनला भारतीय भूभागावर आपला दावा सांगण्यास आणखी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.’