बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, शुभेंदू अधिकारी आणि तृणमूलचे कार्यकर्ते आमनेसामने

| Updated on: Dec 23, 2020 | 2:48 PM

भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याची घटना घडली आहे (clash between suvendu adhikari and tmc supporters in west bengal).

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, शुभेंदू अधिकारी आणि तृणमूलचे कार्यकर्ते आमनेसामने
भाजप
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या आठवड्यात मिदनापूर येथे भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक हिंसाचाराची घटना समोर आली आहे. यावेळी भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याची घटना घडली आहे. शुभेंदू यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मिदनापूर येथे ही घटना घडली आहे (clash between suvendu adhikari and tmc supporters in west bengal).

पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांचा बंगाल दौरा केला. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मिदनापूर भागात भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेत शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या तसेच इतर पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.

शुभेंदू अधिकारी यांनी याआधीदेखील अनेकवेळा त्यांच्यावर हल्ला झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना झेड कॅटेगिरीची सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपकडून वारंवार टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला होत असल्याचा आरोप करण्यात आले आहेत. टीएमसीशी संबंधित लोकांकडून भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

अमित शाह यांची मिदनापूरची सभा आटोपल्यानंतर आपल्या घरी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आली होती. या हल्ल्यात काही कार्यकर्ते जखमी झाले होते. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या गाड्यांच देखील नुकसान झाल्याची माहिती समोर आली होती.

त्याआधी भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले होते. मात्र, भाजपचे काही कार्यकर्ते जखमी झाले होते. या हल्ल्याची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली होती (clash between suvendu adhikari and tmc supporters in west bengal).

संबंधित बातमी :

शाहांची सभा संपली आणि भाजप कार्यकर्त्यांवर कोण तुटून पडलं? बंगालमध्ये राडा