वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत नेत्यांमध्ये झडप, TMC खासदाराच्या हाताला 4 टाके

| Updated on: Oct 22, 2024 | 4:00 PM

वक्फ विधेयकावरील जेपीसीच्या बैठकीत दोन्ह नेत्यांमध्ये जोरदार झडप झाल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी काचेची पाण्याची बाटली फोडली, त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांच्या हाताला चार टाके पडले आहेत.

वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत नेत्यांमध्ये झडप, TMC खासदाराच्या हाताला 4 टाके
Follow us on

वक्फ विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत नेत्यांमध्ये हाणामारी झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी आणि भाजप खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यात हाणामारी झाल्याची माहिती आहे. या हाणामारीत कल्याण बॅनर्जी जखमी झाले आहेत. जेपीसीच्या बैठकीत नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी सुरू असताना कल्याण बॅनर्जी यांनी काचेची पाण्याची बाटली फोडली, त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली. यामुळे त्यांच्या हाताला चार टाके पडले. या हाणामारीमुळे काही काळ बैठक थांबवण्यात आली.

कल्याण बॅनर्जी यांनी अचानक बाटली उचलून टेबलावर फोडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. यामुळे ते जखमी झाले. संसदेच्या आवारात ही बैठक सुरु होती. या बैठकीला अनेक निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ वकील आणि विचारवंत उपस्थित होते. अशी माहिती आहे. बैठकीदरम्यान कल्याण बॅनर्जी अचानक उठले आणि बोलू लागले. याआधीही ते अनेकदा सभेत बोलले होते. मात्र यावेळी ते बोलायला लागल्याने अभिजीत गंगोपाध्याय यांनी आक्षेप घेतला.

अभिजित गंगोपाध्याय यांनी आक्षेप घेतल्यानंतर कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सूत्रांची माहिती आहे. दोघांनीही एकमेकांविरुद्ध अपशब्द वापरले आणि रागाच्या भरात कल्याण बॅनर्जी यांनी काचेची बाटली उचलून टेबलावर फोडली, त्यामुळे ते जखमी झाले.


वक्फ विधेयकावर जेपीसीच्या बैठकीत जोरदार हंगामा झाला. गेल्या आठवड्यातही मोठा गदारोळ झाला होता. विरोधी पक्षाच्या खासदारांनीय यामुळे सभात्याग केला. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षाच्या खासदारांनी भाजप खासदारांवर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप केलाय. समितीच्या अध्यक्षा जगदंबिका पाल यांनीही भाजप खासदारांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर विरोधी पक्षाच्या खासदारांकडून अपशब्द वापरल्याचा आरोप भाजप खासदारांनी केलाय.