अमरावती | 4 जानेवारी 2024 : नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सर्व्तर उत्साहात पार पडले. अनेकांनी विविध ठिकाणी पार्टी करून सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत केले. मात्र आता याच नवीन वर्षात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यू ईअरचे सेलिब्रेशनने करताना अवघ्या 6वी, 7वी, आणि 10 वी तील विद्यार्थ्यांनी बीअर पार्टी केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये सहावी-सातवीमधली ही अवघ्या ११-१२ वर्षांची मुलं बीअर पार्टी करताना आढळली. शाळेचा ड्रायव्हर आणि एसी मेकॅनिकला ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी तेथे जाऊन हा प्रकार उघडकीस आणला.
या घटनेचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल झाला असून तेथे ही अल्पवयीन मुलं एका इमारतीत बसलेली दिसत असून, त्यांच्या आजूबाजूला दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचेही दिसत आहे. या व्हिडीओमुळे एकच खळबळ माजली आहे.
कुठे घडली ही घटना ? नेमकं झालं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या अनाकपल्ली जिल्ह्यातील चोडावरम मंडळ भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याच उघडकीस आले. तेथील शासकीय निवासी शाळेतील शिकणारी ही मुलं असून त्यापैकी अनेक जण अवघ्या ११-१२ वर्षांचे आहेत. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना त्यांनी मद्यपान करून पार्टी केल्याचे समोर आले आहे. अवघ्या ६ वी ७ वी तल्या मुलांनी केलेल्या या बीअर पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून तो शाळेचा ड्रायव्हर आणि एसी मेकॅनिकने काढल्याचे समजते.
इथे पहा व्हिडीओ
సినిమాలు..OTT …ట్యాబ్ ల ప్రభావం..పెద్ద కొండా గాడు చాలామందిని నాశనం చేశాడు ..
అనకాపల్లి జిల్లా చోడవరం…..సంక్షేమ హాస్టల్ లో….న్యూ ఇయర్ సెలెబ్రేషన్స్…మందు కొట్టిన 7 వ తరగతి విద్యార్థులు…
వీడియో తీసిన వ్యక్తి. పై దాడి చేసిన స్టూడెంట్స్…పట్టించుకోని హాస్టల్ వార్డెన్
1/2 pic.twitter.com/g8Nzd5bYRZ— మన ప్రకాశం (@mana_Prakasam) January 3, 2024
काय आहे त्या व्हिडीओत ?
या व्हिडीओमध्ये बॉईज हॉस्टेलमधील काही विद्यार्थी तेथून नजीक असलेल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत बसल्याचे दिसत असून त्यांच्यासोबत दोन अनोळखी इसमही पार्टी करत असल्याचे आढळले. ते सर्वजण बीअर आणि बिर्याणीचा आस्वाद घेताना आढळले. अनेक मुलांच्या समोर दारूच्या रिकाम्या बाटल्याही पडल्या होत्या.
एसी मेकॅनिक, स्कूल ड्रायव्हरला लागला सुगावा
एसी मेकॅनिक आणि शाळेच्या ड्रायव्हरला त्या इमारतीत होणार्या गोंधळाची आवाज आला आणि त्यांनी आणि त्यांनी तपास सुरू केला. त्या ठिकाणी पोहोचल्यावर, त्यांना काही विद्यार्थी मद्यपान करताना दिसली. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरूवात केल्यानंतर, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्या विद्यार्थ्यांनी त्यांना शिवीगाळा केली. तसेच रेकॉर्डिंग रोखण्यासही सांगितले.
अवघ्या ११ -१२ वर्षांचे , अल्पवयीन विद्यार्थी अशी पार्टी करताना आढळल्याने एकच गदारोळ माजला असून बरीच चर्चाही सुरू आहे. ही मुलं लहान असल्याने त्यांची ओळख किंवा इतर माहिती देण्यास शाळेच्या प्रशासनाने नकार दिला असून याप्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, यापूर्वी २०२१ मध्ये, आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत इयत्ता ८ आणि ९ वी मधील पाच विद्यार्थी नशेत आढळले आणि त्याच अवस्थेत ते वर्गात नृत्य करताना आढळले होते. तेव्हाही मोठा गदारोळ माजला होता.