चंदीगड: मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंजाबमध्ये (Punjab) नोकरभरती सुरू करणाऱ्या भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी आज पुन्हा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. भगवंत मान सरकारने पंजाबमध्ये आता राशनची डोअर स्टेप डिलिव्हरी (Rashion Door Step Delivery) करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे मान सरकार राज्यातील जनतेला घरपोच राशन देणार आहे. त्यामुळे पंजाबमधील नागरिकांना राशन दुकानावर रांगा लावण्याची गरज पडणार नाही. हे काम रेशनिंग अधिकारी करणार आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने ही योजना सुरू केली होती. मात्र, केंद्र सरकारने ही योजना रोखली होती. मात्र, आम्ही पंजाबमध्ये ही योजना लागू करणार आहोत, असं भगवंत मान यांनी स्पष्ट केलं. मान यांच्या या निर्णयामुळे धान्याचा काळाबाजार रोखला तर जाणार आहेच, शिवाय प्रत्येकाला रांगेत उभं न राहता राशन मिळणार आहे.
पंजाब आम आदमी पार्टीने ट्विटरवरून मुख्यमंत्री भगवंत मान मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून हा निर्णय जाहीर केला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षातही गरीबांना राशन घेण्यासाठी रेशन दुकानाच्या लांबच लांब रांगांमध्ये उभं राहावं लागतं ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. जग प्रचंड डिजीटल झालं आहे. एका फोन कॉलवर कोणतीही गोष्ट घरपोच मिळते. मग राशन का मिळू नये? असा सवाल भगवंत मान यांनी केला आहे.
अनेकदा गरीबांना राशन घेण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागते. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ज्या लोकांचं हातावर पोट आहे, त्यांना आपला रोजगार बुडवावा लागणं वाईट आहे. दोन दोन किलोमीटरची पायपीट करून राशन आणायला जाणाऱ्या बुजुर्ग आईवडिलांनाही मी ओळखतो. अनेकदा राशन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते. त्याला वारंवार साफ करावे लागते. तरीही त्यांना ते खावं लागतं. मात्र, आता असे होणार नाही, असं मान म्हणाले.
तुम्ही निवडलेल्या आम आदमी पार्टीच्या सरकारने गोरगरीबांना घरापर्यंत राशन देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही डोअर स्टेप डिलिव्हरी म्हणजे घरापर्यंत राशन देणार आहोत. पीठ आणि डाळीही तुम्हाला घरापर्यंत देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आज़ादी के 75 साल बाद भी हमारे लोग कतारों में खड़े हैं। आज हम ये सिस्टम बदलने जा रहे हैं।
अब हमारी बुजुर्ग माताओं को राशन के लिए घंटो लाइन में नहीं लगना पड़ेगा। किसी को अपनी दिहाड़ी नहीं छोड़नी पड़ेगी।
आज मैंने फैसला लिया है कि आपकी सरकार आपके घर राशन पहुंचाएगी। pic.twitter.com/GxgCcCDfPw
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 28, 2022
संबंधित बातम्या: