नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एकूण 12 मागण्या मांडल्या आहेत. ओबीसी, मराठा आणि पदोन्नतीतील आरक्षणासह विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे. मोदींनी या मागण्या गंभीरपणे ऐकून घेऊन त्यात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवले जातील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. (CM Uddhav Thackeray Met PM Narendra Modi 11 major demands in Maharashtra)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर या नेत्यांनी पंतप्रधान मोदींसोबत मराठा आरक्षणावर सुमारे 1 तास 45 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही तिघे आलो, सचिवहीसोबत आहेत. राज्याचे विषय कोणते, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे सर्वांना माहीत आहे. सर्व विषय मोदींनी गांभीर्याने ऐकून घेतले. प्रत्येक विषयांची पत्रंही आम्ही दिली आहेत. राज्यांचे अनेक विषय मांडले. त्याबाबत मोदींनी लक्ष घालतो असं सांगितलं. मोदी हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवतील अशी अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या
‘ते’ दुखणं कायमचं दूर करु, मुख्यमंत्र्यांसमोर अजित पवारांचा पंतप्रधान मोदींना शब्द