नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरापूर्वी औरंगाबादच्या सभेत विरोधकांना उद्देशून आजी, माजी आणि भावी सहकारी असा उल्लेख केला होता. आज दिल्लीत असंच काहीसं चित्रं दिसलं. उद्धव ठाकरे यांनी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भोजन घेतलं. यावेळी आजी, माजी आणि भावी असं चित्रं पाहायला मिळालं. (cm uddhav thackeray’s dinner diplomacy with amit shah)
केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित होते. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली. या बैठकीत नक्षली कारवाया रोखण्यापासून ते नक्षली भागात करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांसोबत जेवणही घेतलं. त्याचा फोटोही व्हायरल झाला आहे.
अमित शहा मुख्यमंत्र्यासोबत भोजनाचा अस्वाद घेत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत एकूण पाच नेते आहेत. अमित शहा, उद्धव ठाकरे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बसलेले आहेत. शहा यांच्या उजव्या हातालाच लागून उद्धव ठाकरे बसले आहेत. तर डाव्या हाताला लागून चौहान बसले आहेत. नितीश कुमार समोरच बसले आहेत. या फोटोत शिवराजसिंह चौहान उद्धव ठाकरेंनकेड पाहून काही तरी बोलताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेही चौहान यांचं म्हणणं मन लावून ऐकताना दिसत असून शहाही चौहान यांचं बोलणं गांभीर्याने ऐकताना दिसत आहेत. या नेत्यांमध्ये नेमकी चर्चा कशावर सुरू आहे हे नेमकं समजू शकलं नाही. मात्र, या नेत्यांमध्ये नक्षलवादी कारवायांवरच चर्चा सुरू असावी असा कयास वर्तविला जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील दौऱ्यावरही यावेळी चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष म्हणजे या पाच नेत्यांपैकी तिन्ही नेते आजी, माजी सहकारी आहेत. उद्धव ठाकरे हे अमित शहांचे माजी सहकारी आहेत. तर नितीश कुमार आजी सहकारी आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे भावी सहकारी होणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बैठकीत काही मागण्या केल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सादरीकरण केलं. नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्गम भागात नवीन पोलीस पोस्ट स्थापन करणे, नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक मोबाईल टॉवर बसवणे, नवीन शाळा बांधण्यावर भर देणे आदींसाठी हा निधी लागणार आहे. त्याबाबतचे सादरीकरणच मुख्यमंत्र्यांनी शहांना दिलं. (cm uddhav thackeray’s dinner diplomacy with amit shah)
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 26 September 2021 https://t.co/wMZJasE8iD #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 26, 2021
संबंधित बातम्या:
नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या; उद्धव ठाकरेंचं शहांसमोर सादरीकरण
Uddhav Thackeay Delhi Visit : अमित शहा यांनी बैठक बोलावली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर
(cm uddhav thackeray’s dinner diplomacy with amit shah)