लखनऊ : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सर्वे करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 3 ऑगस्टला हायकोर्ट यावर निर्णय देईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केससंबंधी महत्वाच वक्तव्य केलं आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, तुम्ही ज्ञानवापी मशीद म्हणणार, तर वाद होणार.
“आपण जर त्याला मशीद म्हटलं, तर वाद होणार. देवाने दृष्टी दिली आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता, त्रिशूळ मशिदीत काय करतय? ज्योतिर्लिंग आहे, देवाच्या प्रतिमा आहेत. त्या भिंती काय सांगतायत? अशी ऐतिहासिक चूक झालीय, त्यावर तोडगा निघाला पाहिजे, असा प्रस्ताव मुस्लिम समाजातून आला पाहिजे” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ANI ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
मुस्लिमांनी नेहमी मोठं मन दाखवलय
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर डॉ. एसटी हसन यांनी रिएक्शन दिली आहे. “2024 ची तयारी सुरु आहे. तिथे 350 वर्षांपासून नमाज अदा केली जातेय, तर मशीद म्हणायच नाही, मग काय म्हणायचं?. मुख्यमंत्र्यांनी अशी विधान करु नयेत. चौकशीत स्पष्ट होईल, तिथे काय आहे” असं एसटी हसन म्हणाले. “संसदेवर त्रिशूळ बनवलं, मग संसेदला मशीद म्हणायच का? मुस्लिमांनी नेहमी मोठं मन दाखवलय. बाबरीच्यावेळी सुद्धा असच झालं होतं” असं एसटी हसन म्हणाले.
EP-85 with Chief Minister of Uttar Pradesh Yogi Adityanath premieres today at 5 PM IST#YogiAdityanath #ANIPodcastwithSmitaPrakash #Podcast
Click the ‘Notify me’ button to get a notification, when the episode goes on air: https://t.co/HkTmnJcuXC pic.twitter.com/DnQd57EUSr
— ANI (@ANI) July 31, 2023
मुस्लिम समाजाने आक्षेप घेतलेला
ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरीशी संबंधित विषय सध्या न्यायालयात आहे. काही महिलांनी मशीद परिसरातील श्रृंगार गौरी क्षेत्रात पुजेची परवानगी मागितली होती. या अर्जात सर्वेची मागणी करण्यात आल होती. स्थानिक कोर्टाच्या आदेशानुसार, या परिसरात सर्वे सुरु करण्यात आला होता. ज्यावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला होता.
3 ऑगस्टला निकाल
मशिदीच्या आता शिवलिंग असल्याचा हिंदू पक्षाचा दावा आहे. मुस्लिम बाजूने हा फव्वारा म्हटला आहे. आता ASI ने सर्वे सुरु करताच विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हायकोर्टाकडे जाण्यास सांगितलं. हायकोर्टाने सुनावणी केली. 3 ऑगस्टला निकाल देणार आहे. तो पर्यंत ASI सर्वेवर बंदी आहे.