मुख्तार अन्सारीच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले होते योगी, IPS अधिकाऱ्याने सांगितला थरार

| Updated on: Mar 31, 2024 | 10:37 AM

कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी यांचा आता मृत्यू झाला आहे. जेलमध्ये असताना त्याची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण मुख्तार अन्सारीची यूपीमध्ये एकेकाळी मोठी दहशत होती. त्याच्या गुंडांनी योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. ज्यात ते थोडक्यात वाचले होते.

मुख्तार अन्सारीच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले होते योगी, IPS अधिकाऱ्याने सांगितला थरार
yogi
Follow us on

योगी आदित्यनाथ 2008 मध्ये गोरखपूरचे खासदार होते. तेव्हा मुख्तार अन्सारी हा गुन्हेगारी जगतातील एक प्रसिद्ध चेहरा होता. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांचा जीव वाचला होता. मुख्तार अन्सारीच्या टोळीने त्यांच्या ताफ्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे सांगण्यात येते. योगींच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. यानंतर पेट्रोल बॉम्बने हल्ला आणि गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी योगींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी एका आयपीएस अधिकाऱ्यावर आली. तेव्हा योगी आदित्यनाथ यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एक AK-47 आणि एक हेलिकॉप्टर देण्यात आले होते. यावरून मुख्तारच्या दहशतीचा अंदाज लावता येऊ शकतो.

मऊ सदर मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले मुख्तार अन्सारी 2005 पासून तुरुंगात होते. त्याच्यावर ६० हून अधिक गुन्हे प्रलंबित आहेत. तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी त्याच्यावर गाझीपूरमधील महंमदाबाद दर्जी टोला येथे कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

निवृत्त आयपीएस अधिकारी ब्रिज लाल यांनी 7 सप्टेंबर 2008 रोजी आझमगडमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण कहाणी सांगितली. या कारवाईत एकाचा मृत्यू झाला होत. तर सहा जण जखमी झाले होते. 1977 च्या बॅचच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्याला एके-47 रायफलसह हेलिकॉप्टरमधून एअर ड्रॉप करावे लागले.

मुख्तार AK-47 घेत पोहोचला होता

2005 मध्ये मऊ येथे जातीय दंगल उसळली होती. ब्रिजलाल म्हणाले की, “यावेळी पाचवेळा आमदार आणि माफियातून नेता झालेला मुख्तार अन्सारी हा उघड्या जीपमधून एके-47 घेऊन फिरत असल्याचे दिसले. त्यावेळी योगी आदित्यनाथ हे गोरखपूरचे खासदार होते. ते स्वतः मऊला रवाना झाले. पण त्यांना जिल्ह्य़ात अटक करण्यात आली. त्यांना राज्यात प्रवेश देण्यात आला नाही. त्यांना दोहरीघाट येथे थांबवून गोरखपूरला परत पाठवण्यात आले. त्यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री होते.

योगींनी त्यांना दहशतवादी म्हटले होते

2008 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्तार अन्सारी यांना आव्हान देत मऊ दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देऊ असे म्हटले होते. ब्रिजलाल म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांनी आझमगडमध्ये हिंदू युवा वाहिनीच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरोधात रॅली काढण्याची घोषणा केली होती. ७ सप्टेंबर २००८ रोजी रॅलीसाठी डीएव्ही कॉलेजचे मैदान निवडण्यात आले होते.”

हल्ल्यातून थोडक्यात बचावले योगी

योगी आदित्यनाथ लाल रंगाच्या एसयूव्हीमध्ये प्रवास करत होते. सुमारे 40 वाहनांचा ताफा त्याच्यासोबत जात होता. हा ताफा आझमगडला पोहोचण्यापूर्वीच त्यावर दगडफेक करण्यात आली. पेट्रोल बॉम्ब फेकले आणि गोळीबार झाला. योगी आदित्यनाथ यांच्या गनरनेही गोळीबार केल्याचे ब्रिज लाल यांनी सांगितले. “हा केवळ योगायोग होता की त्यांनी शेवटच्या क्षणी वाहने बदलली आणि त्याची लाल एसयूव्ही सोडली, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. हा नियोजित हल्ला होता.’

माजी आयपीएस पुढे म्हणाले की, “हल्ल्याची माहिती मिळताच ते हेलिकॉप्टरने आझमगडला रवाना झाले आणि सिव्हिल लाइन्समध्ये उतरले. इतर सर्व अधिकारी आधीच व्यस्त असल्याने मी एके ४७ घेतली आणि तत्कालीन विभागीय आयुक्तांना बाधित भागाची पाहणी करण्यास सांगितले. आझमगडच्या रस्त्यांवर AK-47 घेऊन फिरताना मला आठवतं. आम्ही सतत छापे टाकले आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या अनेकांवर गुन्हे दाखल केले.

2017 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर, योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या काही भागांमध्ये माफियांची कंबर मोडली. अनेक टोळ्यांवर कारवाई करण्यात आली. आज माफिया डॉन आणि व्यावसायिक गुन्हेगार आपल्या जीवाची भीक मागत आहेत. यूपीमध्ये कोणत्याही माफिया डॉन किंवा गुन्हेगारांना स्थान नाही.