ममता बॅनर्जींच्या सुनेची सीबीआयकडून दीड तास चौकशी; बँकॉकमधील व्यवहारांचा हिशोब मागितला

| Updated on: Feb 23, 2021 | 4:49 PM

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची सीबीआयने तब्बल दीड तास चौकशी केली. (Coal pilferage case: CBI examines Abhishek Banerjee’s wife)

ममता बॅनर्जींच्या सुनेची सीबीआयकडून दीड तास चौकशी; बँकॉकमधील व्यवहारांचा हिशोब मागितला
Follow us on

कोलकाता: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची सीबीआयने तब्बल दीड तास चौकशी केली. यावेळी सीबीआयने रुजिरा यांच्याकडून बँकॉकमधील व्यवहाराचीही माहिती मागितल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोळसा घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांच्या सुनेची चौकशी करण्यात आल्याने ममता दीदींसाठी हा फार मोठा झटका मानला जात आहे. (Coal pilferage case: CBI examines Abhishek Banerjee’s wife)

सीबीआयने कालीघाट येथील शांतिनिकेतन हौसिंग कॉम्प्लेक्समध्ये रुजिरा यांची दीड तास चौकशी केली. आज सकाळी 11.34 वाजता सीबीआयच्या आठ सदस्यांची टीम रुजिरा यांच्या घरी पोहोचली. प्रर्दीर्घ चौकशी केल्यानंतर दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी सीबीआयची टीम त्यांच्या घरातून बाहेर पडली. सीबीआयची टीम रुजिरा यांच्या घरी पोहोचण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी रुजिरा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.

लंडन, बँकॉकमधील खात्यावर नजर

या चौकशी दरम्यान बँकॉक आणि लंडनमधील त्यांच्या खात्यातून झालेल्या व्यवहाराची सीबीआयने माहिती मागितली. त्यांच्या अकाउंटची माहिती आणि त्यांनी दिलेल्या उत्तरांची संगती लावण्यात येणार आहे. त्यात गडबड आढळल्यास रुजिरा यांची पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते. याबाबत सीबीआय अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात पुढे काय करायचं याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

विदेशात किती खाते आहेत?

यावेळी सीबीआयने रुजिरा यांना विदेशात किती खाते आहेत याची माहिती विचारली. विदेशात अकाऊंट आहे का? आहे तर किती आहे? या अकाऊंटमधून किती व्यवहार झाला? आदी माहिती सीबीआयने रुजिरा यांना विचारल्याचं सांगण्यात येतं. मात्र, अभिषेक बॅनर्जी यांनी विदेशात त्यांचं एकही खातं नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

लेखी कबुली जवाब नोंदवला

सीबीआयने रुजिरा यांच्या चौकशीची रेकॉर्डिंग केली आहे. तसेच त्यांचं लिखित साक्षही नोंदवण्यात आली आहे. यावेळी रुजिरा यांचे वकीलही उपस्थित होते. यावेळी रुजिरा यांची बहीण मेनका गंभीर यांच्या कबुली जबाबाची संगती लावण्यात आली. तसेच मेनका यांच्याकडेही त्यांच्या अकाऊंटच्या व्यवहाराची माहिती विचारण्यात आली. (Coal pilferage case: CBI examines Abhishek Banerjee’s wife)

 

संबंधित बातम्या:

ममता बॅनर्जींनंतर त्यांच्या कुटुंबातून केवळ ही व्यक्ती ‘मुख्यमंत्री’ पदाची दावेदार, भाजपकडून घेरण्याची तयारी

 सूरतमध्ये काँग्रेसचा धुव्वा, AAP 2 नंबरचा पक्ष ठरण्याची शक्यता

पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार? आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे संकेत

(Coal pilferage case: CBI examines Abhishek Banerjee’s wife)