…तर राखी सावंतही महात्मा गांधी झाली असती, यूपी विधानसभेच्या सभापतींच्या वक्तव्याने वाद

| Updated on: Sep 20, 2021 | 1:29 PM

उत्तर प्रदेश विधानसभेच्या सभापतींनी चक्क ड्रामा क्विन राखी सावंतची (Rakhi Sawant) तुलना महात्मा गांधींशी (Mahatma Gandhi) केल्याने आता नवा वाद तयार झाला आहे. हृदय नारायण दीक्षित असं या सभापती (Speaker of Uttar Pradesh Legislative Assembly) महोदयांचं नाव आहे

...तर राखी सावंतही महात्मा गांधी झाली असती, यूपी विधानसभेच्या सभापतींच्या वक्तव्याने वाद
उत्तर प्रदेश विधानसभेच्या सभापतींनी चक्क ड्रामा क्विन राखी सावंतची तुलना महात्मा गांधींशी केली आहे
Follow us on

लखनौ: उत्तर प्रदेश विधानसभेच्या सभापतींनी चक्क ड्रामा क्विन राखी सावंतची (Rakhi Sawant) तुलना महात्मा गांधींशी (Mahatma Gandhi) केल्याने आता नवा वाद तयार झाला आहे. हृदय नारायण दीक्षित असं या सभापती (Speaker of Uttar Pradesh Legislative Assembly) महोदयांचं नाव आहे, ते यूपीच्या उन्नाव मतदार संघाचे आमदारही (MLA from Unnao) आहेत. दीक्षित महोदयांचा (Hriday Narayan Dixit) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral video) होत आहे, ज्यात ते कमी कपड्यांवर भाष्य करताना दिसत आहेत. दरम्यान हा वाद तयार झाल्यानंतर सभापतींनी आपल्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं म्हटलं आहे. ( Comparison of Mahatma Gandhi with Rakhi Sawant by Uttar Pradesh Assembly Speaker Hriday Narayan Dixit. Controversial statement )

काय आहे नेमकं प्रकरण?

सभापती हृदय नारायण दीक्षित प्रबुद्ध परिषदेत महात्मा गांधीवर बोलत होते. या दरम्यान ते म्हणाले की, ‘‘देशात त्यावेळी गरीबी होती, त्यामुळे गांधीजी कमी कपडे घालायचे, धोतर नेसायचे, गांधीजींना देशाने बापू म्हटलं. आता कपडे उतरवून कुणी महान बनलं असतं, तर राखी सावंतही महान असत्या” याविषयी सांगताने ते म्हणाले की, मी महात्मा गांधींवर 6 हजार पुस्तकं वाचली आहेत, त्यांचा सखोल अभ्यास केला आहे. जर कुणी कमी कपडे घालून मोठं झालं असतं तर राखी सावंतही महान बनल्या असत्या. हेच हृदय नारायण दीक्षित यांचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावरुन त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे.

प्रबुद्ध परिषदेत हृदय नारायण दीक्षित यांची उपस्थिती:

आधी वक्तव्य आता स्पष्टीकरण!

दरम्यान, हृदय नारायण दीक्षित यांच्यावर टिका सुरु झाल्यानंतर ते पुढं आले आहेत, आणि स्पष्टिकरणही दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते लिहतात ‘‘ सोशल मीडियावर काही मित्रांनी माझ्या भाषणाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल केली आहे, ज्यातून वेगळा अर्थ निघतो. हा व्हिडीओ उन्नाव इथल्या प्रबुद्ध परिषदेत केलेल्या माझ्या भाषणाचा एक भाग आहे. ज्यामध्ये सूत्रधारांनी माझी ओळख एक प्रबुद्ध लेखक अशी करुन दिली होती.

 

हृदय नारायण दीक्षित यांचं स्पष्टिकरण:

पुढं ते लिहतात ” केवळ पुस्तकं आणि लेख लिहले म्हणूक कुणी प्रबुद्ध होत नाही. महात्मा गांधी कमी कपडे घालायचे, देशाने त्यांना बापू म्हटलं, पण याचा अर्थ असा नाही की राखी सावंतही महात्मा गांधी होऊ शकतील. कृपा करुन माझं भाषण वास्तवातील संदर्भ वापरुन घ्या. धन्यवाद ”

हेही वाचा:

मुख्यमंत्री बनण्यासाठी हत्तीची सवारी, ते टॉस उडवून शिक्षकांची निवड, कोण आहेत पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी?

आप, बसपा-अकाली दलाला रोखण्यासाठी काँग्रेसची खेळी?; दलित व्होटबँक खेचणार?; कोण आहेत चरणजीतसिंग चन्नी?