नवी दिल्ली: दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या आडून दिल्लीत सुनियोजित हिंसा घडवण्यात आली आहे. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच जबाबदार असून त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दिल्लीतील हिंसा हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे. (Congress blames Amit Shah for ‘intelligence failure’, demands resignation)
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून सुनियोजित हिंसा भडकवली गेली आहे. त्याला अमित शहा जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना एकक्षणही पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
मोदींनी शहांची हकालपट्टी करावी
दिल्लीतील हिंसा ही गंभीर बाब आहे. हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन शहा यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा मोदीही शहा यांना मिळालेले असल्याचं सिद्ध होईल, असं सुरजेवाला म्हणाले.
दीप सिद्धूला अटक का नाही?
दीप सिद्धू आणि त्यांचे सहकारी लाल किल्ल्यात दाखल झाले. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबतचे फोटो याच सिद्धूने सार्वजनिक केले आहेत. लाल किल्ल्यावर झेंडा फडकावून शेतकऱ्यांना भडकावणाऱ्या सिद्धूला अटक कार करण्यात आली नाही? शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचंच हे षडयंत्र होतं हे यावरून सिद्घ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गृहमंत्री काय करत होते?
यावेळी सुरजेवाला यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. उपद्रवींना लाल किल्ल्यात घुसवण्यात आले. तेव्हा पोलीस खुर्चीवर बसून होते. 500 ते 700 लोक लाल किल्ल्यात घुसू कसे शकतात. उपद्रवी लोक लाल किल्ल्यात घुसण्याची प्लॅनिंग करत होते आणि घुसलेही तेव्हा गृहमंत्री काय करत होते?, असा सवाल त्यांनी केला. भाजपशी संबंधित सिद्धू या प्रकरणात असणं यातून सर्व काही स्पष्ट होतंय. लाल किल्ल्यावर झेंडा का लावू दिला? त्यावेळी पोलीस खुर्चीवर बसून होते आणि मीडियाचे कॅमेरे लाल किल्ल्याच्या दिशेने होते, असा दावाही त्यांनी केला. (Congress blames Amit Shah for ‘intelligence failure’, demands resignation)
VIDEO: Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 26 January 2021https://t.co/AwYto4deTV#Headlines
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
हाच मोदी सरकारचा असली चेहरा
काल झालेल्या घटनेला मोदी सरकार, गृहमंत्री आणि प्रशासन जबाबदार नाही का? दिल्ली पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व शहांच्या इशाऱ्यावर होत आहे. त्यामुळेच आम्ही शहा यांची हकालपट्टी करण्याची मागणी करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना बळाच्या जोरावर आंदोलन स्थळाहून हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. हाच मोदी सरकारचा असली चेहरा आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला. (Congress blames Amit Shah for ‘intelligence failure’, demands resignation)
#WATCH: Congress spokesperson Randeep Singh Surjewala blames Union Home Minister Amit Shah for the violence that took place yesterday during farmers’ tractor rally. pic.twitter.com/rMmcWOYGk7
— ANI (@ANI) January 27, 2021
संबंधित बातम्या:
आनंदाची बातमी; 12 हजार कोटींचा निधी मंजूर, प्रत्येक शेतकऱ्याला 4 हजार मिळणार
शेतकरी आंदोलनात फूट?; हिंसेनंतर दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार!
दिल्ली हिंसा: राकेश टिकैत यांच्यासह 6 शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल