पराभवानंतर ढसाढसा रडला हा काँग्रेसचा उमेदवार, माजी मुख्यमंत्र्यांवर केले आरोप

| Updated on: Dec 05, 2023 | 7:33 PM

बुरहानपूरमधून काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र सिंह 'शेरा' यांचा भाजपच्या अर्चना दीदी यांनी 31 हजार मतांनी पराभव केला. पराभवानंतर 'शेरा' स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि ते भावूक झाले. काँग्रेसच्या उमेदवाराला 69,226 मते तर भाजपच्या उमेदवार अर्चना यांना 1,00,397 मते मिळाली.

पराभवानंतर ढसाढसा रडला हा काँग्रेसचा उमेदवार, माजी मुख्यमंत्र्यांवर केले आरोप
congress
Follow us on

Election Result : बुरहानपूरमधून पराभवानंतर काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र सिंह शेरा यांना रडू कोसळले. त्यांनी आपल्या पराभवासाठी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना जबाबदार धरले. शेरा यांनी कमलनाथ यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, काँग्रेस संघटनेने मला कोणत्याही प्रकारे मदत केली नाही. त्यांंनी माझ्या विरोधात काम केले. कमलनाथ यांच्यावर आरोप करताना शेरा म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष त्यांच्या प्रचारासाठी आले नाहीत.

बुरहानपूरमधून भाजपच्या उमेदवार अर्चना दीदी यांनी विजय मिळवला आहे. अर्चना यांनी काँग्रेस उमेदवार शेरा यांचा 31171 मतांनी पराभव केला. पराभवानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. ते पुढे म्हणाले की, मी भाजपच्या बी टीम म्हणजेच एआयएमआयएममुळे हरलो.

शेरा म्हणाले की, माझा 31 हजार मतांनी पराभव झाला तर AIMIM उमेदवाराला 34 हजार मते मिळाली. काँग्रेस नेते शेरा म्हणाले की, जर पक्षाला मी खांडव्यातून लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी मला आतापासून उमेदवारी द्यावी, तरच सेना उभी राहील.

कृतज्ञता सभेत भावूक

निवडणूक हरल्यानंतर काँग्रेसने बुरहानपूरमध्ये कृतज्ञता सभेचे आयोजन केले होते. या कृतज्ञता सभेत सुरेंद्र सिंह ‘शेरा’ भावूक झाले आणि रडले. काँग्रेस उमेदवार रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या कृतज्ञतेच्या भाषणात शेरा म्हणाले की, बुरहानपूर विधानसभा माझे कुटुंब आहे आणि मी यापुढे आमदार नसलो तरी कुटुंबासाठी काम करत राहीन. तुम्ही लोकांनी कोणाला घाबरण्याची गरज नाही.

मी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससाठी लढेन – शेरा

काँग्रेसचे नुकसान मी होऊ देणार नाही,मी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससाठी लढणार आहे. काँग्रेस माझ्या आत आहे. मला तरुणांना रोजगार द्यायचा आहे. मला माझ्या परिसराचा विकास करायचा आहे, म्हणून मी तुमच्या दारी वारंवार येईन. मी ज्येष्ठांचे, माता-भगिनींचे आशीर्वाद घेईन.