काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले की, लालकृष्ण अडवाणींनी 1990 मध्ये रथयात्रा काढली आणि समाजात फूट पाडली. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या सनराइज ओव्हर अयोध्या: द नेशनहूड इन अवर टाईम्स या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने दिग्विजय यांनी भाजपच्या विचारसरणीवरही कठोर भूमिका घेतली, हल्ला चढवला आणि भाजप देशात द्वेष निर्माण करणारा पक्ष असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या, तेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या गांधीवादी समाजवादीला यश मिळू शकले नाही हे स्पष्ट झाले. यानंतर पक्षाने रामजन्मभूमी बाबरी मशीद हा राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा निर्णय घेतला, असा घणाघात त्यांनी केला. (Congress Digvijay Singh slams BJP LK Advani for spreading commununal hate in India after Babri masjid demolition)
#WATCH | Congress’ Digvijaya Singh says “…’Hindtuva’ has nothing to do with Hinduism. Savarkar wasn’t religious.He had said why is cow considered ‘maata’ & had no problem in consuming beef. He brought ‘Hindutva’ word to establish Hindu identity which caused confusion in people” pic.twitter.com/y4zde6RtDM
— ANI (@ANI) November 10, 2021
दिग्विजय सिंह यांनी देशातील द्वेषाच्या वातावरणासाठी अडवाणींना जबाबदार धरले. ते म्हणाले की, 1984 नंतर भाजपने कट्टर हिंदुत्वाचा मार्ग अवलंबला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा आधार आहे. अडवाणींच्या रथयात्रेने देशभरातील समाजात फूट पाडली. अडवाणी जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली.
सलमान खुर्शीदने त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हरामशी केली आहे. रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही त्यांनी कठोर भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदु राष्ट्राच्या विचारसरणीच्या विरोधात असल्याचे त्यांनी लिहिले आहे.
Other News