नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी स्क्रिनिंग समिती जाहीर केली आहे. या समितीवर महाराष्ट्रातून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Congress forms screening committee for UP assembly polls)
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी केसी वेणूगोपाल यांनी ही स्क्रिनिंग समिती जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जितेंद्र सिंग आणि सदस्यपदी दीपेंद्र सिंग हुड्डा आणि वर्षा गायकवाड यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, अजयकुमार लल्लू, आराधना मिसरा मोना आणि उत्तर प्रदेशातील सर्व काँग्रेस सेक्रेटरींचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. इतकंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही त्याच निर्णय घेणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदारपणे तयारीला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात शिवसेना लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशात आम्ही 80 ते 100 जागा लढवू, असं सांगतानाच उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं राऊत यांनी सांगितलं. गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकूण जागा: 403
भाजप : 325
समाजवादी पार्टी : 47
बहुजन समाज पार्टी : 19
काँग्रेस : 7 (Congress forms screening committee for UP assembly polls)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 17 September 2021 https://t.co/QOyEpQzxHd #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 17, 2021
संबंधित बातम्या:
‘लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हा गावस्कर माझा देव होता’; रोखठोक ट्वीटनंतर आव्हाडांकडून भूमिका स्पष्ट
रावसाहेब दानवे भाजपचे अध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं; राऊतांचा चंद्रकांतदादांना अप्रत्यक्ष टोला
नागपूर ZP पोटनिवडणूक : महाविकास आघाडी तुटल्यात जमा, शिवसेनेचे सर्व जागांवर उमेदवार
(Congress forms screening committee for UP assembly polls)