नवी दिल्ली – काँग्रेसचे खासदार अधीररंजन (Congress MP Adhir Ranjan)यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (President Murmu)यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. या त्यांच्या वक्तव्याचे प़डसाद गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. भाजपाच्या महिला खासदारांनी (BJP MP)या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात गोँधळ घातला. सोनिया माफी मागा, असे पोस्टर हातात घेऊन त्यांनी घोषणाबाजी केली. स्मृती इराणी म्हणाल्या की सोनिया गांधी यांना माफी मागावीच लागेल. लोकसभा आणि राज्यसभेत झालेल्या गोँधळानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. संसदेची कारवाई स्थगित झाल्यानंतर स्मृती इराणी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात शाबिद्क चकमकही झाली. खासदार रमा देवी अधीररंजन यांच्या वक्तव्यावर जेव्हा सोनिया यांच्याशी बोलण्यास गेल्या, त्यावेळी सोनिया म्हणाल्या की, अधीर रंजन यांनी माफी मागितलेली आहे. तसेच या प्रकरणात माझे नाव का घेण्यात आले, असा सवालही सोनियांनी विचारला. त्यावर तिथे उपस्थित असलेल्या स्मृती इराणी यांनी, मॅडम मी आपली मदत करु शकते, असे वक्तव्य केले. यावर सोनियांनी डोन्ट टॉक टू मी असे म्हणत स्मृती इराणींना फटकारले. हा प्रकार झाल्यावर, सोनियांनी भाजपाच्या महिला खासदारांना धमकावल्याचा आरोप, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला आहे.
या सगळ्या गोंधळातच अधीर रंजन यांनी संसदेच्या बाहेर या वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण दिले. त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. अधीर रंजन म्हणाले- चुकीने मी मूर्मू यांना राष्ट्रपत्नी म्हणालो. आता यावर तुम्ही मला फासावर चढवू इच्छित असाल तर चढवा. सत्ताधारी राईचा पर्वत करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अधीर रंजन यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीची वेळही मागितली आहे. ते म्हणालेत की मी राष्ट्रपतींची माफी मागेन, ढोंग्यांची नाही.
#WATCH | “He has already apologised,” says Congress interim president Sonia Gandhi on party’s Adhir Chowdhury’s ‘Rashtrapatni’ remark against President Droupadi Murmu pic.twitter.com/YHeBkIPe9a
— ANI (@ANI) July 28, 2022
स्मृती इराणी सभागृहात म्हणाल्या की- काँग्रेस गरीब आणि आदिवासींच्या विरोधात आहे. आपल्या चुकीवर माफी मागण्याऐवजी काँग्रेस आक्रमक पवित्रा घेते आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वतीने माफी मागण्याची गरज आहे. काँग्रेसने प्रत्येक भारतीयाचा अपमान केला आहे. यावर माध्यमांशी बोलताना सोनिया यांनी अधीर रंजन यांनी यापूर्वीच आपली चूक कबूल केली असल्याचे सांगितले आहे.
#WATCH | “Rashtrapatni” row | …I accepted my mistake…What do they say about Sonia Gandhi during polls? About Shashi Tharoor’s wife? About Renuka Chowdhury? I sought time from President, might get appointment the day after tomorrow, I’ll speak with her personally: AR Chowdhury pic.twitter.com/7W1PAw5JzG
— ANI (@ANI) July 28, 2022
राष्ट्रपती भवनात जात असताना जाऊ दिले नाही, याबाबत माध्यमांनी बुधवारी अधीर रंजन यांना विचारणा केली होती. त्यावर आजही जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्तानची राष्ट्रपती सगळ्यांसाठी आहे, आमच्यासाठी का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
सध्याच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक महागाई आणि जीएसटीच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. १८ जुलैला सुरु झालेल्या अधिवेशनात पहिल्या दिवशी राज्यसभेत गोँधळ झाला. त्यानंतर दोन्ही सदनांचे कामकाज १९ तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले. २० जुलैलाही काम रोखण्यात आले. या आठवड्यात संसदेत गोँधळ केल्यप्रकरणी लोकसभेतील चार तर राज्यसभेतील २० खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.