नवी दिल्ली: पंजाबमध्ये (Punjab) राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (captain amrinder singh) भाजपमध्ये जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आज अमरिंदर सिंह नवी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ते भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांची दिल्लीत भेट घेतील. ( Congress leader and former Punjab Chief Minister Capt Amarinder Singh is likely to join the BJP. Talks that Amarinder Singh will meet JP Nadda and Amit Shah in Delhi )
अमरिंदर सिंह यांच्या सल्लागारांनी शक्यता नाकारली!
असं असलं तरी, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या माध्यम सल्लागार रवीन ठकुराल यांनी या सगळ्या शक्यता नाकारल्या आहेत, ते म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल अनेक बातम्या येत आहे, मात्र ते दिल्लीच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत, तिथं ते त्यांच्या काही मित्रांना भेटणार आहेत आणि नवीन मुख्यमंत्र्यांसाठीचं कपूरथलाचं घरही ते रिकामं करणार आहेत. त्यामुळे अशा शक्यता वर्तवणं चुकीचं आहे.
Too much being read into Cap Amarinder Singh’s visit to Delhi. He’s on a personal visit, during which he’ll meet some friends & also vacate Kapurthala house for the new CM. No need for any unnecessary speculation: Raveen Thukral, Media Advisor to Capt Amarinder Singh
(File pic) pic.twitter.com/NHl3ZLNFM6
— ANI (@ANI) September 28, 2021
दरम्यान, पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादाला कंटाळून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांच्यासोबत त्याचे वाद असल्याचं बोललं जातं. त्यानंतर काँग्रेसने अमरिंदर सिंह यांच्याजागी चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचा नवा मुख्यमंत्री बनवलं. त्यामुळेच आता शक्यता वर्तवली जात आहे की, काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या वादाला कंटाळून कॅप्टन अमरिंदर सिंह पक्ष सदस्य पदाचाही राजीनामा देऊ शकतात.
कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेसमध्ये निराश
आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोशल मीडियावर आपला म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले होते की, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत, मात्र पंजाबसाठी त्यांचं जे धोरण राहिलं आहेत, त्यातून त्यांच्यात अनुभवाची कमी साफ दिसते. हेच नाही तर त्यांनी पक्षात आपल्याला अमानित झाल्यासारखं वाटतं असंही ते म्हणाले होते. त्याच्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
काँग्रेस प्रवक्त्यांनी दिलं होतं उत्तर
अमरिंदर सिंह यांच्या वक्तव्यानंतर, काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्याल उत्तर दिलं होतं. त्या म्हणाला, अमरिंदर सिंह यांचं वक्तव्य त्यांच्या पदाला शोभत नाही, मात्र ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळेच शक्यता आहे की त्यांनी हे वक्तव्य रागात केलेलं असावं.
पुढे त्या म्हणाल्या, ” ते माझ्या वडिलांच्या वयाचे असतील, वृद्ध लोकांना राग लवकर येतो आणि जास्त प्रमाणात असतो. रागात ते खूपकाही बोलून जातात, त्यांचा राग, त्यांचं वय, त्यांच्या अनुभवाचा आम्ही आदर करतो, मला वाटतं की ते याबद्दल नक्की परत विचार करतील”
हेही वाचा: