आयुष्यभर ज्यांनी संघ आणि भाजपवर टीका केली, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर अनेक आरोप केले, तेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह गृहमंत्री अमित शाह आणि संघाची स्तुती करताना दिसले. (Digvijay Praise to Amit Shah or RSS) दिग्विजय सिंह यांचं नर्मदा परिक्रमा यात्रेवरील पुस्तक प्रकाशित झालं, (Digvijay Singh Book Release on Narmada Yatra) या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दिग्विजय सिंह बोलत होते. ते म्हणाले की, या नर्मदा परिक्रमेदरम्यान मला सरकार आणि संघाचं भरपूर सहकार्य मिळालं. हेच नाही तर ज्या अमित शाह आणि संघाचा मी सर्वात मोठा टीकाकार आहे, त्यांनी केलेलं सहकार्य विसरु शकत नाही असंही ते म्हणाले. ( congress-leader-digvijay-singh-praise-to-amit-shah-or-rss-during-narmada-yatra-on-book-release )
दिग्विजय सिंह म्हणाले की, नर्मदा यात्रेदरम्यान अमित शाहा यांनी वन अधिकाऱ्यांना सांगून माझी व्यवस्था शासकीय विश्रामगृहात केली. मी त्यांचा सर्वात मोठा टीकाकार असुनही,त्यांनी माझी पूर्ण काळजी घेतली, माझ्या नर्मदा यात्रेत त्यांनी कुठलाही अडथळा येऊ दिला नाही. पुढे ते म्हणाले की,’ मी अमित शाहा यांना समोरासमोर कधीही भेटलेलो नाही, पण तरीही त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी मी गृहमंत्र्यांचे आभार मानतो’
दिग्विजय सिंहाकडून अमित शाहांचं कौतुक
नर्मदा यात्रेवरील आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी दिग्विजय सिंह म्हणाले की, संघ आणि सरकारने या नर्मदा यात्रेदरम्यान मला केलेली मदत हा राजकीय सामंजस्याचा पुरावा आहे. आपण कधी कधी या गोष्टी विसरुन जातो. आपल्याला लक्षात राहत नाही. माझे विचार हे संघाहून भिन्न आहेत, तरीही संघाचे लोकही मला या यात्रेत नेहमी भेटायला येत होते.
दिग्विजय सिंहांची 3,300 किलोमीटरची पदयात्रा
दिग्विजय सिंह म्हणाले की, परस्परविरोधी मते असूनही संघ कार्यकर्त्यांना त्यांना भेटण्याची सूचना देण्यात आली. नर्मदा यात्रेदरम्यान मिळालेल्या सहकार्यासाठी त्यांनी केंद्रीय तसेच गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. 2018 मध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पत्नी अमृता सिंह यांच्यासोबत मिळून नर्मदा पदयात्रा केली होती. त्यावेळी ते 192 दिवस चालले होते. त्यांची ही यात्रा नरसिंहपूर जिल्ह्यातल्या बर्मन घाटावर संपली होती. घाटावर पोहचल्यानंतर दिग्विजय यांनी सपत्नीक पूजा केली होती. सिंह पती पत्नीचा हा प्रवास तब्बल 3, 300 किलोमीटर लांबीचा होता.
हेही वाचा: