नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य केलेल्या रेआर रमेश कुमार यांना प्रियंका गांधी यांनी सुनावलंय. कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार केआर रमेश कुमार (KR Ramesh Kumar) यांनी महिलांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भर विधानसभेत के आर रमेश कुमार यांनी ज्यावेळी बलात्कार रोखता यत नसेल त्यावेळी झोपा आणि त्याचा आनंद घ्या, असं विधान केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी (Vishweshwar Hegde Kageri) यांनी याचा निषेध करण्याचऐवजी त्या वक्तव्यावर जोरजोरात हसू लागले होते.
#WATCH| “…There’s a saying: When rape is inevitable, lie down&enjoy,” ex Karnataka Assembly Speaker & Congress MLA Ramesh Kumar said when Speaker Kageri, in response to MLAs request for extending question hour, said he couldn’t& legislators should ‘enjoy the situation’ (16.12) pic.twitter.com/hD1kRlUk0T
— ANI (@ANI) December 17, 2021
प्रियंकांनी सुनावलं!
या संपूर्ण वादानंतर अखेर केआर रमेश कुमार यांनी माफीही मागितली होती. मात्र ज्येष्ठ काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यावर प्रियंका गांधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही असं बोलूच कसं शकता, अस म्हणत प्रियंका गांधींनी त्यांना सुनावलंय. इतकंच काय तर त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेधही नोंदवलाय. केआर रमेश यांच्या वक्तव्या कोणत्याही स्थितीत बचाव करता येऊ शकत नाही. बलात्कार हा अत्यंत घृणास्पद गुन्हा आहे. त्याच्यावर अशाप्रकारची केलेली वक्तव्य ही शोभा देत नाही, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी केआर रमेश कुमार यांचा समाचार घेतला.
I wholeheartedly condemn the statement made earlier today by Sri. K.R.Ramesh Kumar. It is inexplicable how anyone can ever utter such words, they are indefensible. Rape is a heinous crime. Full stop.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 17, 2021
नेमकं काय घडलं होतं?
कर्नाटकात महापुरामुळं झालेल्या शेतीच्या आणि पिकाच्या नुकसानीसंदर्भात चर्चा करण्याची मागणी आमदारांकडून सुरु होती. यावेळी सभागृहात गदारोळ सुरु होता. विधानसभा अध्यक्षांनी यावेळी आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विधानसभा अध्यक्ष हेगडेयांनी रमेश कुमार यांना उद्देशून एक वक्तव्य केलं. ‘रमेश कुमार तुम्हाला माहितीचं आहे की या परिस्थितीचा मला आनंद घ्यायला पाहिजे, मी ठरवलंय आता मी कोणालाही थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, तुम्ही चर्चा करा,असं हेगडे म्हणाले. यावर उत्तर देताना काँग्रेस आमदार रमेश कुमार यांनी विधानसभेत म्हटलं की, ‘एक म्हण आहे….ज्यावेळी बलात्कार रोखता येत नाही त्यावेळी झोपून राहावं आणि आनंद घ्यावा, अशीच स्थिती आज निर्माण झालीय.
या सगळ्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या कविता रेड्डी यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला होता. कर्नाटकच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष के आर रमेश कुमार आणि सध्याचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांची मानसिकता महिला विरोधी आहे. दोघांनी राजकारण सोडून द्यावं, अशी मागणी कविता रेड्डी यांनी केली होती. दरम्यान, रमेश कुमार यांनी 2019 मध्ये अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरही महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
संबंधित बातम्या :
Ram Shinde | कर्जतचं राजकारण तापलं! उमेदवारांना धमकावलं जात असल्याचा राम शिंदेचा आरोप
Sindhudurg : आगामी नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल- नारायण राणे
MSRTC Strike: 20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा नाही?; अनिल परब नेमकं काय म्हणाले?