“बजेटमध्ये जातीय जनगणनेचा मुद्दा असावा. 95 टक्के भारताला दलित, आदिवासी, मागास, गरीब जनरल कास्ट, अल्पसंख्यांक समाजाला जातीय जनगणना हवी आहे. सरकार हलवा वाटते. 2 ते 3 टक्के लोक हलवा वाटतात. जातीय जनगणनेने देश बदलेलं” असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. “देशातील पिछडे अभिमन्यू नाही. चक्रव्यूह भेदणारे आहेत. पहिलं पाऊल इंडिया आघाडीने उचललं आहे. तुमच्या पंतप्रधानांचा आत्मविश्वास आम्ही उडवून टाकला आहे” असं राहुल गांधी म्हणाले.
“हे कमल फॉर्मेशनवाले लोक आहेत. त्यांना हिंदुस्तानचा स्वभाव समजलेला नाही. हिंसाचार, द्वेष भारताचा स्वभाव नाही. हिंदुस्थानचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येक धर्मात चक्रव्यूह विरोधात फॉर्मेशन आहे” असं राहुल गांधी म्हणाले. “हिंदू धर्मात शिवाच्या वरातील कुठल्याही धर्माचा व्यक्ती येऊन नाचू शकतो, गाऊ शकतो. शिख धर्मात कोणालाही सेवा करण्यापासून रोखता येत नाही. इस्लाममध्ये कोणीही मशिदीत जाऊ शकतो. शिवाची वरात आणि चक्रव्युहामध्ये लढाई आहे. आम्ही चक्रव्यूह तोडण्याच काम करतो. मनरेगा, हरीत क्रांती ही चक्रव्यूह मोडणारी काम आहेत. यामुळे देशात आनंद येतो, आत्मविश्वास वाढतो” असं राहुल गांधी म्हणाले.
‘चक्रव्यूह शिवाच्या वरातीला हरवू शकत नाही’
“चक्रव्यूह शिवाच्या वरातीला हरवू शकत नाही. तुम्ही स्वत: हिंदू म्हणता, पण तुम्हाला हिंदू धर्म समजलेला नाही” अशा शब्दात भाजपावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावरुन बोलताच सत्ताधारी बाकावरुन गदारोळ सुरु झाला. त्यावेळी ते म्हणाले की, “मी काही अपमान केलेला नाही. आयुष्यभर हिंदू धर्माचा मी अपमान करु शकत नाही” असं राहुल गांधी म्हणाले.