दिल्लीः देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसाठी (Loksabha Election) कॉंग्रेसकडून (Congress) मोठ्या बदलाची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याऐवजी आता प्रियंका गांधी यांनाच पंतप्रधान पदाच्या उमेदवार आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांना पुढे आणू शकतात. या गोष्टीवर आता सहजासहजी कुणीही विश्वास ठेऊ शकणार नाही, पण सगळा कॉंग्रेस पक्ष याक्षणी राहुल गांधींच्या नावाला विरोध नसला तरी आता पक्षाकडून राहूल गांधी यांच्या नावासाठी पक्ष आता तयार होण्याबाबत साशंक असणार आहे. कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राशिद अल्वी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार आहेत, त्यानंतर लगेच त्याविषयावर पलटी मारुन सांगितले की, त्या मुख्यमंत्री पदाच्या दावेजदार नाहीत तर पंतप्रधान पदासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकतो.
उत्तर प्रदेशाबाबत अल्वींकडून उत्तर प्रदेशच्या निवडणूकीनिमित्त आणि प्रियंका गांधी यांना खूष करण्यासाठी असे वक्तव्य केले जाऊ शकते मात्र कॉंग्रेसचे प्रवक्ते म्हणून त्यांचे हे वक्तव्य गंभीरपणे घ्यावे लागेल. यामध्ये तथ्य असले तरी हे वक्तव्य ती वेळ येण्याआधीच अल्वींकडून अनावधानानेही जाऊ शकते. आणि या वाक्यत सत्यता असलीच तर पिछेहाट झालेल्या कॉंग्रेसमध्ये प्रियंका गांधी यांच्यामुळे चैतन्य येऊ शकते.
राहुल गांधी यांच्या नावावर कॉंग्रेस पक्षाकडून दोन वेळा निवडणूक लढविण्यात आली आहे, मात्र दोन्ही वेळा मतदारांनी त्यांना नाकारले आहे. त्यामुळे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 2014 पासून आतापर्यंत राजकारणाच्या इतिहासात कॉंग्रेसला लोकसभेच्या निवडणूकीत 206 वरून थेट निव्वळ 44 जागांवर यावे लागले आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट आली आणि 30 वर्षांपासून आणि 7 निवडणूकांमध्ये कुठला पक्षला एकहाती सत्ता मिळाली असेल तर ती भाजपला मिळाली होती.
भारतात बहुमतानी कोणते सरकार येणार नाही एकमेकांच्या पाठिंब्यावरच येथून पुढची राजकीय वाटचाल चालू राहिल. या परिस्थिती राज्य पातळीवर प्रादेशिक पक्षांची चलती असतानाच त्यामध्येही फक्त कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षाचाच दबादबाब देशातील प्रादेशिक पातळीवर होता. तर भारतीय जनता पक्षाचा प्रभाव काही राज्यांध्येच दिसून येत होता. कर्नाटक सोडून दक्षिण भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपचे नामोनिशानही नव्हते.तर अन्य राज्यांतून राष्ट्रीय पक्ष फक्त नावापुरतेच शिल्लक होते. गेल्या दहा वर्षात केंद्रात असलेल्या यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. 2014 नंतर कॉंग्रेस पक्षाची वाताहात झाली, आणि ती निरंतर सुरूच आहे. तर भाजपची ताकद मात्र एवढी वाढली आहे की, काही प्रत्येक राज्यात त्यांच्या जागा वाढून खऱ्या अर्थाने भाजप पक्ष आता राष्ट्रीय पक्ष झाला आहे.
मागील सात आठ महिन्यापासून 2024 च्या निवडणूकीसाठी इतर पक्षांच्या हात मिळवणीबाबत चर्चा चालू आहे. विरोधी पक्षातील आणि कॉंग्रेसमधील काहींचा राहुल गांधींच्या नेतृत्वावर भरोसा नाही, आणि याबाबत कॉंग्रेस पक्षही ही गोष्ट मान्य करायला तयार नाही. त्याही पुढे जाऊन गांधी घरण्याविरुद्ध कुरघोड्या करण्यासही सुरुवात झाली आहे. कॉंग्रेसकडून पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंतप्रधान पदाचा दावेदार गांधी घराण्याशिवाय इतरांना देण्याच्या मानसिकतेत नाही. यामध्ये याचीही शक्यता आहे की, गांधी परिवाराने पदांची विभागणी केली तर राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि पंतप्रधान पदाची दावेदार म्हणून प्रियंका गांधींच्या नावही पुढे येऊ शकते.
प्रियंका गांधी जर पंतप्रधान पदाच्या दावेदार होतील तर ज्या नेत्यांना कॉंग्रेसमध्ये नेतृत्व बदल पाहिजे त्यांना थोडा बदल मिळणार आहे.या राजकारणात सगळीत मोठी गोष्ट ही आहे की, सरकार बनवण्याची संधी कॉंग्रेसला मिळाली तर पुन्हा सत्ताही गांधी घराण्याकडेच असणार आहे. त्यामुळेच प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची आपण दावेदार असल्याचे सांगून त्यांनी आपले वक्तव्य पुन्हा फिरवले.
संबंधित बातम्या