कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती, दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे माजी खासदार अभिजीत मुखर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल भवनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी टीएमसीत प्रवेश केला. यावेळी टीएमसीचे लोकसभेतील नेते सुदीप बंद्योपाध्याय आणि टीएमसीचे प्रदेश सचिव आणि मंत्री पार्थ चॅटर्जी उपस्थित होते. (Congress suffered a setback in Bengal, former President Pranab Mukherjee’s son Abhijit Mukherjee joined TMC)
अभिजीत मुखर्जी यांनी नुकतीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसीचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अभिजीत मुखर्जी टीएमसीत जाण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. नुकत्याच झालेल्या बंगालच्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत काँग्रेसचं नव्हे तर डाव्यांचाही सुपडा साफ झाला आहे.
अभिजीत मुखर्जी यांनी टीएमसीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. ममता बॅनर्जी यांनी त्याला परवानगी दिल्यानंतर मुखर्जी यांचा आज टीएमसीत प्रवेश होत आहे. मुखर्जी हे नलहाटीचे आमदार होते. ते दोन वेळा जंगीपूर येथून लोकसभेवर निवडून आले होते. ते अनुभवी राजकारणी आहे. भाजप मुक्त अभियानासाठी त्यांचा फायदा होईल. सर्व समाजाला एकजूट करण्यासाठी त्यांची मोलाची मदत मिळेल, असं पार्थ चॅटर्जी यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांनीही टीएमसीमध्ये प्रवेश केला. मुकुल रॉय आणि त्यांचे चिरंजीव शुभ्रांशु रॉय यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. तब्बल चार वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे. प्रवेशाआधी रॉय यांनी टीएमसी कार्यालयात येऊन ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. रॉय यांच्या पक्ष प्रवेशानंतर माजी मंत्री राजीव बॅनर्जी आणि माजी आमदार सव्यसाची दत्ताही लवकरच टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
मुकुल रॉय यांनी सर्वात आधी टीएमसीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2017मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर टीएमसीतील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर मुकुल रॉय यांना पाहिजे तसा मानसन्मान दिला गेला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत नगण्य होती. मिथुन चक्रवर्ती आणि सुवेंदू अधिकारी यांच्या भोवतीच पक्ष फिरत होता. त्यामुळे रॉय अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Congress suffered a setback in Bengal, former President Pranab Mukherjee’s son Abhijit Mukherjee joined TMC)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5 July 2021 https://t.co/O0EiZA3kdM #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2021
संबंधित बातम्या:
ममता बॅनर्जींशी जुळवून घेण्यासाठी चौधरींना लोकसभेतील नेते पदावरून हटवणार?; काँग्रेसच्या हालचाली सुरू
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची प्रकृती बिघडली; लोहिया रुग्णालयात दाखल
(Congress suffered a setback in Bengal, former President Pranab Mukherjee’s son Abhijit Mukherjee joined TMC)