तुम्ही काँग्रेसच्या कॅलेंडर वुमन पाहिल्यात?; राहूल नाही, प्रियांका गांधी घराघरात!

| Updated on: Jan 22, 2021 | 12:39 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या फोटोचंही कॅलेंडर काढण्यात आलं आहे. (Congress to distribute calendars chronicling Priyanka Gandhi's political journey)

तुम्ही काँग्रेसच्या कॅलेंडर वुमन पाहिल्यात?; राहूल नाही, प्रियांका गांधी घराघरात!
Follow us on

लखनऊ: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या फोटोचंही कॅलेंडर काढण्यात आलं आहे. या कॅलेंडरमधून प्रियांका यांच्या कामाचा आढावा घेतानाच जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी केलेला संघर्ष साकारण्यात आला आहे. या कॅलेंडरचं उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावात वाटप करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने काँग्रेसकडून प्रियांका गांधी यांची इमेज बिल्डिंग करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Congress to distribute calendars chronicling Priyanka Gandhi’s political journey)

नव वर्षाचं औचित्य साधून उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातून हे कॅलेंडर जारी करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी यांचा उत्तर प्रदेशातील जनसंपर्क, त्यांनी केलेले आंदोलन आदींचे फोटो या कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर छापण्यात आले आहेत. त्यातून प्रियांका गांधी यांचा संघर्ष जिवंत करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात हे कॅलेंडर वाटप केलं जात आहे. कॅलेंडरच्या माध्यमातून पुन्हा एकदा घराघरात पक्ष पोहोचवण्याचं काम काँग्रेसकडून केलं जात आहे. यापूर्वी वायनाड येथील पार्टी कार्यालयातून राहुल गांधी यांच्या फोटोचं कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आलं होतं.

10 लाख कॅलेंडर

उत्तर प्रदेशात सुमारे 10 लाख कॅलेंडर पाठवण्यात आले आहेत. गाव, शहर आणि वॉर्डापर्यंत हे कॅलेंडर पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार या कॅलेंडरचं वाटप होत आहेत. 12 पेजचं हे कॅलेंडर आहे.

कॅलेंडरमध्ये काय?

सोनभद्र येथील उभ्भा येथील हत्याकांडानंतर आदिवासी महिलांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करतानाचे फोटो, हाथरस पीडितेच्या घरी जाऊन त्यांचं पीडित कुटुंबाचं सांत्वन करतानाचे फोटो, हाथरसकडे जाताना पोलिसांकडून लाठीचार्ज होत असताना त्याला विरोध करतानाचे फोटो, सीएए-एनआरसीच्या विरोधात रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करतानाचे फोटो, अजमगडमधील एका मुलीचे अश्रू पुसतानाचे फोटोंसह अमेठी, रायबरेली, हरियाणा आणि झारखंडमधील प्रियांका यांच्या जनसंपर्काचे फोटोही या कॅलेंडरमध्ये छापण्यात आले आहेत. (Congress to distribute calendars chronicling Priyanka Gandhi’s political journey)

 

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना पर्याय कोण?; अशोक गेहलोत होणार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष?

कर्नाटकच्या भाजप सरकारवर पुन्हा ‘सीडी’चं संकट?; 15 आमदार बंडाच्या तयारीत?

जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, त्यात गैर काय?, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

(Congress to distribute calendars chronicling Priyanka Gandhi’s political journey)