नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) गेले दहा दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. दोन दिवसांचा अपवाद वगळता 21 मे ते 31 मे या कालावधीत नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या 50 दिवसांतील हा 24 तासांच्या कालावधीतला निचांकी आकडा आहे. ताज्या आकडेवारीनुसार कालच्या दिवसात 1 लाख 52 हजार 734 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 3 हजार 128 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. (Corona Cases in India in the last 24 hours Second wave decreasing)
दिनांक – एका दिवसातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या
21 मे – 2 लाख 59 लाख रुग्ण
22 मे – 2 लाख 57 हजार रुग्ण
23 मे – 2 लाख 40 हजार रुग्ण
24 मे – 2 लाख 22 हजार रुग्ण
25 मे – 1 लाख 95 हजार रुग्ण
26 मे – 2 लाख 8 हजार रुग्ण
27 मे – 2 लाख 11 हजार रुग्ण
28 मे – 1 लाख 86 हजार रुग्ण
29 मे – 1 लाख 74 हजार रुग्ण
30 मे – 1 लाख 65 हजार रुग्ण
31 मे – 1 लाख 52 हजार रुग्ण
टक्केवारी काय सांगते
कोरोनातून बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) – 91.60%
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट – 9.04%
दैनिक पॉझिटिव्हिटी रेट – 9.07% (सलग आठवडाभर दहा टक्क्यांहून कमी) (Corona Cases Second wave decreasing)
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 80 लाख 47 हजार 534 वर गेला आहे. देशात 2 कोटी 56 लाख 92 हजार 342 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 29 हजार 100 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 20 लाख 26 हजार 92 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. कालच्या तुलनेत अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या 88,416 ने कमी झाली.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 31 लाख 54 हजार 129 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
एकूण रूग्ण – 2,80,47,534
एकूण डिस्चार्ज –2,56,92,342
एकूण मृत्यू – 3,29,100
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 20,26,092
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 21,31,54,129
India reports lowest daily new cases of 1.52 lakh in 50 days today. Active caseload further declines to 20,26,092 after cases decreased by 88,416 in last 24 hours: Union Health Ministry
— ANI (@ANI) May 31, 2021
संबंधित बातम्या :
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांच्या घरात, कोरोनाबळीही घटते
(Corona Cases in India in the last 24 hours Second wave decreasing)