नवी दिल्ली : देशात कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेनही (Coronavirus new strain) वेगाने वाढत असल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 114 वर पोहोचली आहे. तात्काळ हा संसर्ग फैलावापासून रोखणं महत्त्वाचं असल्याचंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे. त्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना प्रत्येक राज्याला देण्यात आल्या आहेत. (corona news new strain 114 people infected with new corona strain in india)
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी मंत्रालयाकडून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या रुग्णांना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात येत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही आयसोलेशनमध्ये (Isolation) ठेवण्यात आलं आहे.
एकीकडे देशात कोरोनाचा फैलाव वाढत आहेत तर दुसरीकडे या जीवघेण्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात जैय्यत तयारी करण्यात आली आहे. कोव्हिड-19 विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (शनिवार 16 जानेवारी) सकाळी 11.30 वाजता मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे.
तत्पुर्वी, देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी 10.30 वाजता विलेपार्लेतल्या डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईत एकूण 9 केंद्रांवर 40 बूथवर लसीकरण होणार आहे. सुरवातीला दररोज सरासरी 4 हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे 1 लाख 30 हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी 7 हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी. त्यानंतर तिसरऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मुंबईत 63 लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यांद्वारे दररोज सुमारे 50 हजार नागरिकांचे लसीकरण करता येणार आहे. (corona news new strain 114 people infected with new corona strain in india)
हे ही वाचा
(corona news new strain 114 people infected with new corona strain in india)